ईशा कोप्पीकर झळकणार वेबसीरिजमध्ये, साकारणार ही भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 19:46 IST2019-04-01T19:45:31+5:302019-04-01T19:46:00+5:30
बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर बॉलिवूडमध्ये सक्रीय नसली तरीदेखील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ती काम करते आहे. लवकरच ती एका वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.

ईशा कोप्पीकर झळकणार वेबसीरिजमध्ये, साकारणार ही भूमिका
बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर बॉलिवूडमध्ये सक्रीय नसली तरीदेखील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ती काम करते आहे. नुकतेच तिने भारतीय जनात पक्षात प्रवेश करून राजकरणात प्रवेश केला आहे. तसेच ती लवकरच एका वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. फिक्सर असे या वेबसीरिजचे नाव असून यात ईशा पोलीस अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे.
ईशा कोप्पिकर पहिल्यांदाच वेबसीरिजमध्ये काम करणार आहे. फिक्सर ही हिंदी वेबसीरिज असून यात ईशा जयंती जावडेकर नामक मराठी पोलीस अधिकारीची भूमिका निभावताना दिसणार आहे. या नव्या माध्यमात काम करण्यासाठी ईशा खूप उत्साही आहे. सध्या ती एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर ती वेबसीरिजच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे.
ईशा कोप्पीकर सुमारे १८ वर्षांनंतर साऊथ इंडस्ट्रीत कमबॅक करतेय. नरसिम्मा हा ईशाचा शेवटचा साऊथ चित्रपटात होता. पण आता अभिनेता शिवकार्तिकेयच्या आगामी चित्रपटात ईशा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. हा सायन्स फिक्शन सिनेमा एलियनवर आधारित आहे.
ईशाने आतापर्यंत हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. कंपनी सिनेमातील ‘खल्लास’ या आयटम साँगमधून ईशाने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले.