‘या’ व्यक्तिचा प्रचंड तिरस्कार करते ईशा गुप्ता! वाचा, कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 12:44 IST2017-12-25T07:14:50+5:302017-12-25T12:44:50+5:30
आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोशूटमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री गुप्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. होय, सोशल मीडियावर तिने ...

‘या’ व्यक्तिचा प्रचंड तिरस्कार करते ईशा गुप्ता! वाचा, कारण!!
आ ल्या हॉट आणि बोल्ड फोटोशूटमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री गुप्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. होय, सोशल मीडियावर तिने मनातली वेदना बोलून दाखवली आहे. ईशाच्या आयुष्यातील एका व्यक्तिचा ती प्रचंड तिरस्कार करते. पण असे असूनही या व्यक्तिला ईशा ना सोडू शकत ना त्याला झेलू शकत. ईशाने मनातली ही सगळी ठसठस बोलून दाखवली आहे. केवळ इतकेच नाही, तर त्या व्यक्तिचा फोटोही शेअर केला आहे. जगाला या व्यक्तिबद्दल कळावे, त्याचा चेहरा लोकांसमोर यावा, अशी ईशाची इच्छा आहे. आता ही व्यक्ति कोण, याची उत्सुकता तुम्हाला लागली असणारच. तर ईशा जिचा प्रचंड तिरस्कार करते, ती व्यक्ती आहे, बिकास. होय, बिकास असे त्याचे नाव आहे. ही व्यक्ती ईशाकडून प्रचंड मेहनत करून घेते. ईशाचा प्रचंड ‘छळ’ करते. तुम्ही ओळखले नसेल तर आम्हीच या बिकासबद्दल आणखी माहिती तुम्हाला देतो. हा बिकास दुसरा तिसरा कुणी नसून ईशाचा फिटनेस ट्रेनर आहे. ईशाची टोन्ड बॉडी बघता, बिकास किती स्ट्रिक्ट असेल, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता.
![]()
ALSO READ : SEE HOT PICS : ईशा गुप्ताच्या या सात फोटोंनी ओलांडल्या बोल्डनेसच्या परिसीमा!!
सध्या फोटोशूटच्या बाबतीत ईशा बड्या बड्या अभिनेत्रींना मात देताना दिसतेच ते याच बिकासमुळे. या बिकासमुळे इतकी टोन्ड बॉडी ईशाला मिळाली आहे. खरे तर यासाठी ईशाने बिकासचे आभार मानायला हवेत. त्यामुळे ईशाचा हा बिकासवरचा राग तितकाच लटका आहे, हे नव्याने सांगायची गरज नाहीच.
अलीकडे इशाने इंडस्ट्रीतील ‘सो कॉल्ड’ लोकांवरची नाराजी बोलून दाखवली होती. मला आजही इंडस्ट्रीतील अनेकांकडून आऊटसाईडर म्हणून वागवले जाते, असे ती म्हणाली होती. मी बॉलिवूडमध्ये आले, तेव्हाच हा प्रवास सोपा नाही, हे मला कळून चुकले होते. कदाचित माझे आडनाव गुप्ता ऐवजी वेगळे असते (मोठ्या स्टारकिड्सला उद्देशून) तर हा प्रवास इतका कठीण झाला नसता. बॉलिवूडमधील लोक सतत त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून मी आऊटसाईडर आहे, हे मला सांगत असतात, अशा शब्दांत तिने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर टीका केली होती.
.