सोनाक्षी सिन्हाकडे गुडन्यूज? पती जहीरसोबतचा 'तो' व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले- "ही तर प्रेग्नंट..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 10:49 IST2025-07-04T10:49:06+5:302025-07-04T10:49:28+5:30
लग्नाच्या एक वर्षांनी सोनाक्षी गुडन्यूज देण्याच्या तयारीत आहे की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. एका व्हिडीओमुळे सोनाक्षी गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

सोनाक्षी सिन्हाकडे गुडन्यूज? पती जहीरसोबतचा 'तो' व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले- "ही तर प्रेग्नंट..."
शत्रुघ्न सिन्हांची लेक आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या पर्सनल आयुष्यामुळे कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. गेल्याच वर्षी सोनाक्षीने बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत लग्न करत संसार थाटला. त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. आता लग्नाच्या एक वर्षांनी सोनाक्षी गुडन्यूज देण्याच्या तयारीत आहे की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. एका व्हिडीओमुळे सोनाक्षी गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
सोनाक्षी सिन्हाला पती जहीर खानसोबत एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट करण्यात आलं. दोघांनीही पापाराझींना फोटोसाठी पोझ दिल्या. याचा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. सोनाक्षीने काळ्या रंगाचा वन पीस ड्रेस घातल्याचं दिसत आहे. तर जहीरने शर्ट आणि जीन्स असा कॅज्युअल लूक केल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून सोनाक्षी प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
या व्हिडिओत सोनाक्षीचं वजन थोडं वाढलेलं दिसत आहे. यावरुन चाहत्यांनी ती गरोदर असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. "ही प्रेग्नंट वाटत आहे", "ही गरोदर आहे का?" अशा कमेंट केल्या आहेत. तर एकाने "ती गरोदर नसून तिचं वजन वाढलं आहे" असं म्हटलं आहे.