The Song Of Scorpions: इरफान खानचा शेवटचा चित्रपट 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स'चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 04:49 PM2023-04-19T16:49:44+5:302023-04-19T16:51:50+5:30

Irrfan khan, The Song Of Scorpions : इरफान खानच्या या सिनेमाचा ट्रेलर पाहून तुम्हीही भावुक व्हाल...

Irrfan khan's last film The Song of Scorpions trailer out | The Song Of Scorpions: इरफान खानचा शेवटचा चित्रपट 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स'चा ट्रेलर रिलीज

The Song Of Scorpions: इरफान खानचा शेवटचा चित्रपट 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स'चा ट्रेलर रिलीज

googlenewsNext

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) आज आपल्यात नाही. पण तो प्रेक्षकांच्या मनात कायम जिवंत राहील. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारानं गाठलं आणि इरफानने अनपेक्षित एक्झिट घेतली. त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. आजही इरफानची पत्नी सुतापा (Sutapa Sikdar)आणि मुलगा बाबील इरफानच्या आठवणी शेअर करतात, तेव्हा चाहते भावुक होतात.  मात्र, आता इरफान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, इरफान खानला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. इरफान खानचा ‘द साँग ऑफ स्कॉर्पिअन’ (The Song Of Scorpions) हा चित्रपट आता मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. आजच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला.

इरफानचा मुलगा मुलगा बाबिल त्याच्या सोशल मिडियावर याची माहिती दिली आहे.  या चित्रपटाचा ट्रेलरही त्याने शेअर केला आहे. इरफानचा अभिनय नेहमीच थक्क करतो. हा सिनेमाही याला अपवाद नाही.  

ट्रेलरची सुरुवात होते ती गोलशिफ्तेह फराहानी म्हणजेच नूरन हिच्या एन्ट्रीने. ती या चित्रपटात वैद्याची भुमिका करतांना दिसत आहे. विंचू चावल्यानंतर नूरन उपचारासाठी जाते असते.  इरफानने यात आदमलाची भूमिका साकारली आहे. तो नूरनचा प्रियकर दाखवण्यात आला आहे. तो इरफान फराहानीला लग्नासाठी विचारतांना दिसतो. यानंतर मात्र या प्रेमाला जोरदार विरोध होतो.  चित्रपटाची कथा राजस्थानमधील एका गावातील आहे. ट्रेलरमधील बॅकग्राऊंड म्युझिक खिळवून ठेवतं आणि इरफानला पाहताना देहभान विसरायला होतं.  

'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स' या सिनेमात इराणी अभिनेत्री गोलशिफ्तेह फराहानी मुख्य भूमिकेत आहे. वहिदा रहमान यांचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.  'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन' येत्या 28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.  

Web Title: Irrfan khan's last film The Song of Scorpions trailer out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.