इरफान खानच्या हिंदी मीडियमच्या सीक्वलची शूटिंग ऑगस्टपासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 10:22 IST2018-02-10T04:52:13+5:302018-02-10T10:22:13+5:30

इरफान खानच्या हिंदी मीडियम चित्रपटाचा मिळालेल्या यशानंतर हिंदी मीडियमचा सीक्वल तयार करण्यात येणार आहे. 2017 मध्ये आलेल्या इरफान आणि ...

Irrfan Khan's Hindi medium sequel shoots from August | इरफान खानच्या हिंदी मीडियमच्या सीक्वलची शूटिंग ऑगस्टपासून

इरफान खानच्या हिंदी मीडियमच्या सीक्वलची शूटिंग ऑगस्टपासून

फान खानच्या हिंदी मीडियम चित्रपटाचा मिळालेल्या यशानंतर हिंदी मीडियमचा सीक्वल तयार करण्यात येणार आहे. 2017 मध्ये आलेल्या इरफान आणि पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरचा हिंदी मीडियम चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटाचे कौतूक समीक्षकांनी देखील केले होते. या चित्रपटाला फिल्मफेअरचे अॅवॉर्डदेखील मिळाले आहे.  

या चित्रपटाच्या सीक्वलची शूटिंग ऑगस्ट महिन्यांपासून सुरु होऊ शकते. हिंगी मीडियममध्ये इरफान खानने राज बत्रा नावाची भूमिका साकारली होती. सीक्वलमध्ये हिंदी मीडियमची गोष्ट दहा वर्षांनी पुढे जाणार आहे. मात्र या चित्रपटात त्याच्या पत्नीची भूमिका कोण साकारणार हे अजून निश्चित झालेले नाही.  

मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटात इरफान खान कॉलेजमधील एज्युकेशन सिस्टमवर भाष्य करणार आहे.  2017मध्ये आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन साकेत चौधरीने केले होते मात्र आता तो या चित्रपटाचा भाग नाही आहे. मात्र निर्माता दिनेश विजानच आहे. 

हिंदी मीडियमच्या आधी इरफानचा  किर्ती कुल्हारीसोबत ‘ब्लॅकमेल’ चित्रपट मार्चमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनय देव करणार आहे. टी-सीरिज आणि आरडीपी मोशन पिक्चर्स हा चित्रपट प्रोड्यूस करणार आहे. नावावरून हा चित्रपट गंभीर वाटत असला तरी प्रेक्षकांना यात कॉमेडीचा जबदस्त तडका पाहायला मिळणार आहे. तसेच इरफान लवकरच अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

ALSO READ :  63rd Jio filmfare awards 2018​ : ६३ व्या फिल्मफेअर पुरस्कारात इरफान खान, विद्या बालनची बाजी! राजकुमार रावला सर्वोत्कृष्ट क्रिटिक्स अवार्ड!!

हा चित्रपट एक सत्य घटनेवर आधारित आहे. रहिमा खान नावाची लेडी डॉन सपना दीदीच्या नावाने फेमस होती. रहीमाने आपल्या नवऱ्याच्या खूनचा बदला घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मारण्याचा प्लॉन आखला होता. मात्र यात तिचाच मृत्यू झाला. चित्रपटात रहिमाची भूमिका दीपिका पादुकोण साकारणार आहे. तर इरफान खान  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची भूमिका साकारणार आहे. विशाल भारव्दाज यांचा हा बिग बजेट चित्रपट असणार आहे. २०१८ च्या अखेरीस हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे. 

Web Title: Irrfan Khan's Hindi medium sequel shoots from August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.