इरफान खानच्या 'द लंचबॉक्स'चा सीक्वेल येणार? 'हा' अभिनेता साकारु शकतो भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 12:25 IST2025-10-17T12:25:04+5:302025-10-17T12:25:41+5:30
निर्मात्या गुनीत मोंगा यांनी दिली प्रतिक्रिया

इरफान खानच्या 'द लंचबॉक्स'चा सीक्वेल येणार? 'हा' अभिनेता साकारु शकतो भूमिका
दिवंगत अभिनेता इरफान खानचे सर्वच सिनेमे प्रेक्षकांच्या मनात आहेत. त्यातलाच एक सर्वांच्या आवडीचा सिनेमा म्हणजे 'द लंचबॉक्स'. २०१३ मध्ये आलेल्या या सिनेमाचं आजही खूप कौतुक होतं. सिनेमात इरफानसोबत निम्रत कौर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांचीही भूमिका होती. एक वेगळीच गोष्ट, सरळ पण प्रश्नात टाकणारा क्लायमॅक्स, अप्रतिम अभिनय यामुळे सिनेमाचं क्रिटिक्सनेही कौतुक केलं होतं. आता याच सिनेमाच्या सीक्वेलची चर्चा आहे. मात्र सीक्वेलमध्ये इरफानची जागा कोणता अभिनेता घेणार?
ऑस्कर विजेती निर्माती गुनीत मोंगा नुकतीच पत्रकार कोमल नाहटा यांच्या पॉडकास्टमध्ये आली होती. यावेळी तिने 'द लंचबॉक्स' च्या सीक्वेलवर भाष्य केलं. तसंच सिनेमा इरफानच्या जागी तू कोणत्या अभिनेत्याला घेशील यावरही तिने उत्तर दिलं. ती म्हणाली, "द लंचबॉक्स च्या सीक्वेलमध्ये इरफानच्या भूमिकेसाठी मला अनिल कपूरला घेऊ इच्छिते."
'द लंचबॉक्स' ची गोष्ट साजन फर्नांडिस नावाच्या व्यक्तीवर असते जो मुंबईत एकटाच राहत असतो. इरफान खानने ही भूमिका साकारली होती. तर दुसरीकडे इला ही महिला डबा सर्विस देत असते. एक दिवस डिलीवरी चुकते आणि तो डबा इरफानला पोहोचतो. त्यात एक चिठ्ठीही असते. यानंतर दोघांमध्ये चिठ्ठ्यांचा सिलसिला सुरु होतो. शेवटी भेटायचं ठरल्यावर साजन मात्र इलाला दुरुनच पाहतो आणि भेटणं टाळतो. हाच सिनेमाचा क्लायमॅक्स असतो. हा सिनेमा इरफानच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी एक आहे.