​इरफान खान-दीपक डोबरियाल येणार एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 19:50 IST2016-12-01T19:50:58+5:302016-12-01T19:50:58+5:30

बॉलिवूडमध्ये इरफान खान याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर मागील काही वर्षांत दीपक डोबरियाल यांने विनोदी भूमिकांमधून ...

Irrfan Khan - Deepak Dobriyal coming together | ​इरफान खान-दीपक डोबरियाल येणार एकत्र

​इरफान खान-दीपक डोबरियाल येणार एकत्र

लिवूडमध्ये इरफान खान याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर मागील काही वर्षांत दीपक डोबरियाल यांने विनोदी भूमिकांमधून बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडली आहे. हे दोन्ही कलावंत 2004 साली आलेल्या ‘मकबूल’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. आता तब्बल 12 वर्षांनतर दीपक व दीपक डोबरियाल आगामी ‘हिंदी मीडिअम’ या चित्रपटात एकत्र येणार आहेत. 

इरफान खान हा बहुमुखी प्रतिभेचा धनी असलेला कलाकार आहे. केवळ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूड चित्रपटांमधूनही त्याने आपली ओळख निर्माण केली आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या टॉम हँक्सच्या ‘इन्फ र्नो’ या चित्रपटात त्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयाची प्रसंशा अनेकांनी केली आहे. त्याने ‘पिकू’ व ‘जुरासिक पार्क’ या चित्रपटात साकारलेली विनोदाचे अंग असलेली भूमिका प्रेक्षकांना आवडली. 

दीपक डोबरियाल याने विनोदी भूमिकांमधून आपले स्थान बॉलिवूडमध्ये निर्माण केले आहे. ‘तनू वेड्स मनू’ व त्याच्या सिक्वलमध्येही त्याने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली. ओमकारा या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. यासोबतच दीपकला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. दोन्ही अभिनेते 2004 साली प्रदर्शित झालेल्या मकबूल या चित्रपटात एकत्र दिसले होते. आता सुमारे 12 वर्षानंतर दोघेही एकत्र येत आहेत. आगामी हिंदी मीडिअम या चित्रपटात इरफान खान व दीपक डोबरियाल यांच्या भूमिका आहेत. 

दिनेश व्यांजना निर्मित ‘हिंदी मीडिअम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन साकेत चौधरी करीत आहे. ‘हिंदी मीडिअम’मध्ये इरफान व दीपिक विनोदी भूमिका साकारणार आहे. इरफानने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांच्या विपरित ‘हिंदी मीडिअम’मधील भूमिका आहे. 

Web Title: Irrfan Khan - Deepak Dobriyal coming together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.