इरफान खान साडीत दिसतो असा! तुम्हीही पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2017 15:49 IST2017-03-26T10:17:03+5:302017-03-26T15:49:53+5:30

इरफान खान सध्या त्याच्या ‘हिंदी मिडियम’ या चित्रपटात बिझी असायला हवा. पण हे, काय इरफान भलतेच काही करताना दिसतोय. ...

Irfan Khan looks like saree! You see! | इरफान खान साडीत दिसतो असा! तुम्हीही पाहा!

इरफान खान साडीत दिसतो असा! तुम्हीही पाहा!

फान खान सध्या त्याच्या ‘हिंदी मिडियम’ या चित्रपटात बिझी असायला हवा. पण हे, काय इरफान भलतेच काही करताना दिसतोय. होय, चक्क बायकांची कामे करण्यात इरफान सध्या गढून गेला आहे. आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. अर्थात हाही इरफानच्या कामाचाच भाग आहे. सध्या ‘हिंदी मिडियम’चे शूटींग सुुरू आहे. दिल्लीचा चांदनी चौक, आनंद लोक, करोल बाग, संगम विहार अशा रिअल लोकेशन्सवर या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. याच शूटींगचा भाग अर्थात भूमिकेची गरज म्हणून इरफान लोकांना साडी नेसवून दाखवतो आहे. हा सिनेमा एक रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमा आहे. यात इरफान एका पंजाबी व्यापाºयाची भूमिका साकारताना दिसणार आहे. यात तो चांदणी चौकातील एका कपड्यांच्या दुकानाचा मालक बनला आहे. आता कपड्यांचा दुकानदार म्हटल्यान महिला ग्राहकांना साडीची ट्रायल देणे आलेच ना. सध्या इरफान हेच करतोय.



या चित्रपटात इरफानच्या अपोझिट आहे ती, पाकिस्तानी अभिनेत्री सबा कामर. या चित्रपटाचे दिग्दर्शन साकेत चौधरी याने केले आहे. यापूर्वी साकेतने विद्या बालन व फरहान अख्तर यांच्या भूमिका असलेल्या  शादी के साईड इफेक्ट्स  या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.  
या चित्रपटात दिल्लीच्या चांदनी चौक येथे राहणाºया एका मीडल क्लास कुटुंबाची कथा दाखविली जाणार आहे. हे कुटुंबीय दिल्लीतील हाय क्लास सोसायटीमध्ये अ‍ॅडजेस्ट होण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे त्यांच्या जीवनात होणारी धावपळ ही या चित्रपटाची मुख्य कथा आहे.  
 

Web Title: Irfan Khan looks like saree! You see!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.