आयरा खान-नुपूर शिखरे उदयपूरला पोहोचले, आलिशान हॉटेलमध्ये पार पडणार शाही सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 08:04 PM2024-01-05T20:04:22+5:302024-01-05T20:08:18+5:30

आयराने नुपूर शिखरेशी नोंदणी पद्धतीने लग्न केलं.

Ira Khan and Nupur Shikhare arrive in Udaipur | आयरा खान-नुपूर शिखरे उदयपूरला पोहोचले, आलिशान हॉटेलमध्ये पार पडणार शाही सोहळा

आयरा खान-नुपूर शिखरे उदयपूरला पोहोचले, आलिशान हॉटेलमध्ये पार पडणार शाही सोहळा

आमिर खानची लेक आयरा खान (३ जानेवारी रोजी) लग्नबंधनात अडकली. आयराने नुपूर शिखरेशी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. या दोघांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सध्या चर्चेत आहेत. मुंबईतल्या ताज लँड्स एंड याठिकाणी नोंदणी पद्धतीने हे लग्न पार पडलं. त्यानंतर येत्या 8 जानेवारी रोजी आयरा आणि तिचा पती नुपूर शिखरे यांच्या  ग्रँड लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे बोलले जात आहे. यासाठी आयरा खान-नुपूर शिखरे उदयपूरला पोहोचले. यावेळी दोघेही अगदी सिंपल कॅज्युअल लूकमध्ये दिसले.

कोर्ट मॅरेजनंतर आयरा आणि नुपूर हे उदयपूरमध्ये हिंदी विवाहपद्धतीनुसार लग्नही करणार असल्याचं कळतंय. जिथे हा सोहळा पार पडणार आहे. ती राजस्थानमधील ही अत्यंत महागडी प्रॉपर्टी आहे. आयरा खानची आई रीना दत्ताही उदयपूरला पोहचल्या. तसेच आमिर खानदेखील उदयपूरला पोहोचला आहे. तो मुलगा आझाद रावबरोबर उदयपूरमध्ये दाखल झाला. 

आयरा आणि नुपूर गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मे महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला होता. आता कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न उरकत त्यांनी आयुष्यभरासाठी एकमेकांचे जोडीदार झाले आहेत. आयरा खान आणि नुपूर शिखरे लग्नामध्ये खूपच सुंदर दिसत होते. नववधूच्या रुपामध्ये आयरा खूपच क्युट दिसत होती. तर नुपूरने डार्क ब्लू कलरची शेरवानी परिधान केली होती.

Web Title: Ira Khan and Nupur Shikhare arrive in Udaipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.