MI vs CSK : धोनीचा हॅट्रिक Six! स्टेडियममध्ये बॉलिवूड अभिनेत्री जोरात ओरडली, व्हिडिओ एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 03:03 PM2024-04-15T15:03:52+5:302024-04-15T15:04:30+5:30

IPL 2024: धोनीने Six मारताच बॉलिवूड अभिनेत्री स्टेडियममध्येच ओरडली, व्हिडिओ होतोय व्हायरल

ipl 2024 mi vs csk neha dhupia reaction after ms dhoni six hatric at wankhede stadium watch video | MI vs CSK : धोनीचा हॅट्रिक Six! स्टेडियममध्ये बॉलिवूड अभिनेत्री जोरात ओरडली, व्हिडिओ एकदा पाहाच

MI vs CSK : धोनीचा हॅट्रिक Six! स्टेडियममध्ये बॉलिवूड अभिनेत्री जोरात ओरडली, व्हिडिओ एकदा पाहाच

सध्या देशात सर्वत आयपीएलची जोरदार चर्चा सुरू आहे. आयपीएलच्या १७व्या हंगामात रविवारी(१४ एप्रिल) पहिल्यांदाच मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने भिडले. वानखेडेवर खेळवला गेलेला MI vs CSK सामना अटीतटीचा झालेला पाहायला मिळाला. या सामन्यात चेन्नईची टीम मुंबईवर भारी पडली. राजासारखं खेळत रोहित शर्माने नाबाद १०६ धावांची खेळी केली. पण, धोनीच्या त्या २० रनांनी अख्खा गेम बदलला आणि मुंबईला हार पत्करावी लागली. 

 MI vs CSK सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्याला  बॉलिवूड सेलिब्रिटीही हजर होते. करीना कपूर, नेहा धुपिया, जॉन अब्राहम आणि अंगद बेदी हे कलाकार स्टेडियममधून क्रिकेटर्सला चिअर करताना दिसले. या सामन्यातील काही फोटो आणि व्हिडिओ नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या आवडत्या टीमला सपोर्ट करताना दिसत आहे. पण, या सगळ्यात नेहाच्या एका व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

चेन्नईचा डॅरिल मिचेल झेलबाद झाल्यानंतर वानखेडेच्या मैदानावर महेंद्रसिंग धोनी आला. शेवटच्या षटकात अवघ्या ४ चेंडूसाठी आलेल्या धोनीने मैदान दणाणून सोडलं. धोनीने हार्दिक पांड्याच्या शेवटच्या चार चेंडूंवर सलग तीन सिक्स ठोकले. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर २ धावा काढल्या. धोनीने सिक्सची हॅट्रिक करताच नेहा धुपियाचा आनंद गगनात मावेनासा झाला. स्टेडियममध्ये नेहा वेड्यासारखी जोरजोरात ओरडताना दिसली. याचा व्हिडिओही नेहाने शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 

Web Title: ipl 2024 mi vs csk neha dhupia reaction after ms dhoni six hatric at wankhede stadium watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.