Video: 'आर यू हॅपी?' म्हणत शाहरुखची लेक ढसाढसा रडली, KKR ने IPL जिंकताच संपूर्ण कुटुंब भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 09:04 AM2024-05-27T09:04:33+5:302024-05-27T09:05:14+5:30

KKR ने IPL 2024 चा किताब जिंकताच शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाचा भावूक व्हिडीओ समोर आलाय (KKR, Shah rukh khan)

ipl 2024 kkr final emotional moment of Shahrukh khan and daughter suhana video viral | Video: 'आर यू हॅपी?' म्हणत शाहरुखची लेक ढसाढसा रडली, KKR ने IPL जिंकताच संपूर्ण कुटुंब भावूक

Video: 'आर यू हॅपी?' म्हणत शाहरुखची लेक ढसाढसा रडली, KKR ने IPL जिंकताच संपूर्ण कुटुंब भावूक

काल IPL 2024 ची फायनल रंगली. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद या दोन संघामध्ये काल IPL ची फायनल रंगली. या फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने जबरदस्त खेळ दाखवत सनरायझर्स हैद्राबादवर सहज विजय मिळवला. कोलकाता संघाने यंदाच्या IPL च्या हंगामात सुरुवातीपासून शेवटपर्यंत जबरदस्त खेळ केला. आणि याचा परिणाम म्हणजे फायनलमध्येही KKR ने बाजी मारली. KKR ने IPL चं विजेतेपद मिळवताच शाहरुख खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा इमोशनल मूमेंट बघायला मिळाला. 

अन् शाहरुखची मुलं गहिवरली

शाहरुख खान हा यंदाच्या IPL मध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत KKR संघाला चिअर करण्यासाठी मैदानात उपस्थित होता. फायनलच्या काही दिवस आधीच डिहायड्रेशनमुळे शाहरुख हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. तरीही KKR चा अंतिम सामना बघायला शाहरुख मैदानावर हजर होता. KKR ने IPL मध्ये बाजी मारताच शाहरुखच्या आनंदाला उधाण आलं. लेक सुहानाला मिठी मारण्याआधी शाहरुखने तोंडावर मास्क लावला होता.

 

शाहरुखचं संपूर्ण कुटुंब एकत्र

पुढे सुहानाने शाहरुखला घट्ट मिठी मारली. आर यू हॅप्पी म्हणत सुहानाच्या डोळ्यात पाणी आलं. पुढे लेकीला धीर देण्यासाठी शाहरुखने मास्क उतरवला. शाहरुखचा छोटा लेक अबराम आणि मोठा मुलगा आर्यन या दोघांनीही शाहरुखला मिठी मारली. शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाचा भावूक क्षण कॅमेरात कैद झालेला दिसला. अशाप्रकारे शाहरुख आणि त्याच्या तीनही मुलांनी KKR चा विजयोत्सव साजरा केला. दरम्यान काल KKR ने SRH चा ८ विकेट्सनी पराभव केला. 

Web Title: ipl 2024 kkr final emotional moment of Shahrukh khan and daughter suhana video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.