IPL 2024: अक्षय कुमार, ए.आर. रेहमान...; आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीला कोण कोण बॉलिवूड सेलिब्रिटी येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 05:47 PM2024-03-20T17:47:38+5:302024-03-20T17:47:52+5:30

IPL 2024 : यंदाही आयपीएल २०२४ला दणक्यात सुरुवात होणार असून अनेक सेलिब्रिटीही उपस्थित राहणार आहेत. 

IPL 2024 akshay kumar ar rehman sonu nigam tiger shroff to perform at opening ceremony | IPL 2024: अक्षय कुमार, ए.आर. रेहमान...; आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीला कोण कोण बॉलिवूड सेलिब्रिटी येणार?

IPL 2024: अक्षय कुमार, ए.आर. रेहमान...; आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीला कोण कोण बॉलिवूड सेलिब्रिटी येणार?

आयपीएलच्या १७व्या हंगामासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. आयपीलच्या या नव्या हंगामाला २२ मार्चपासून सुरूवात होणार आहे. चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये आयपीएलचा उद्घाटन सोहळा पार पडला आहे. दरवर्षी बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या परफॉर्मन्सने आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीची शान वाढवतात. यंदाही आयपीएल २०२४ला दणक्यात सुरुवात होणार असून अनेक सेलिब्रिटीही उपस्थित राहणार आहेत. 

मीडिया रिपोर्टनुसार, यंदाच्या आयपीएल सोहळ्यात बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक ए आर रेहमान आणि सोनू निगम परफॉर्म करताना दिसणार आहेत. ए. आर. रेहमान आणि सोनू निगम यांचा सुरेल आवाज यंदाच्या आयपीएलमध्ये स्टेडियममध्ये घुमणार आहे. तर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ त्यांच्या खास परफॉर्मन्सने सोहळ्याची शान वाढवणार आहेत. २२ मार्चला संध्याकाळी ६:३० वाजता आयपीलच्या ओपनिंग सेरेमनीला सुरुवात होणार आहे. 

आयपीएल २०२४मधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूमध्ये खेळवला जाणार आहे. स्टार स्पोर्टसवर प्रेक्षकांना आयपीएल २०२४चे सामने पाहता येणार आहेत. तर जिओ सिनेमावरही आयपीएलचं लाइव्ह स्ट्रिमिंग क्रिकेटप्रेमींना पाहता येणार आहे. 

Web Title: IPL 2024 akshay kumar ar rehman sonu nigam tiger shroff to perform at opening ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.