यंदा कर्तव्य आहे! बॉलिवूड अभिनेत्री 'आप' च्या नेत्यासोबत PBKS vs MI मॅच पाहायला आली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 20:11 IST2023-05-03T20:10:28+5:302023-05-03T20:11:16+5:30
गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर असलेल्या मुंबईसाठी आता पुढील सर्व सामने महत्त्वाचे आहे. पंजाब १० गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. MIचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

यंदा कर्तव्य आहे! बॉलिवूड अभिनेत्री 'आप' च्या नेत्यासोबत PBKS vs MI मॅच पाहायला आली
IPL 2023, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा(Parineeti Chopra) गेल्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्रीच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. आज परिणीती आणि आप नेते राघव चड्ढा पंजाब किंग्सविरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना पाहण्यासाठी मोहालीत सोबत दिसले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिणीती आणि राघव या आठवड्यात म्हणजे १३ मे रोजी एंगेजमेंट करू शकतात.परिणीती आणि राघव एका रिंग सेरेमनीनंतर त्यांच्या नात्याला अधिकृत करतील. या एंगेजमेंट फंक्शनमध्ये फक्त त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी होतील. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, परिणीती आणि राघव १३ मे रोजी एंगेजमेंट करणार आहेत. त्यांच्या एंगेजमेंटचे विधी दिल्लीत होणार असल्याचेही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. यापूर्वी अशी बातमी आली होती की परिणीती आणि राघवचा रोका सेरेमनी पार पडली असून ते यावर्षी ऑक्टोबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. आज हे कपल सोबत दिसल्याने या चर्चांना दुजोरा मिळाला आहे.
दरम्यान, गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर असलेल्या मुंबईसाठी आता पुढील सर्व सामने महत्त्वाचे आहे. पंजाब १० गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. MIचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रिली मेरेडीथला आज बाकावर बसवले गेले आहे आणि अर्शद खानचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला गेला. त्याने त्याच्या पहिल्याच षटकात प्रभसिमरन सिंगला ( ९) यष्टिरक्षक इशान किशनकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. शिखऱ धवन आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३५ चेंडूंत ४९ धावांची भागीदारी केली. MIचा यशस्वी गोलंदाज पियूष चावलाला गब्बरने चांगले झोडले होते, परंतु त्यानेच शिखरची विकेट घेतली. २० चेंडूंत ३० धावा करून शिखर यष्टिचीत झाला.
Piyush Chawla gets the key breakthrough!
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2023
Shikhar Dhawan steps down, but is stumped by Ishan Kishan.
Live - https://t.co/IPLsfnImuP#TATAIPL#PBKSvMI#IPL2023pic.twitter.com/fd4blfWR11