बिनधास्त सोनमचे, बिनधास्त उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 11:43 IST2016-10-14T05:44:58+5:302016-10-17T11:43:31+5:30

बेधडक पण तेवढेच प्रामाणिक  मत मांडण्यात सोनम कपूर एक पाऊल पुढे आहे. सोशल मीडियावरही अगदी परखडपणे ती तिचे मत ...

Inspired Sonam, unmatched answer! | बिनधास्त सोनमचे, बिनधास्त उत्तर!

बिनधास्त सोनमचे, बिनधास्त उत्तर!

धडक पण तेवढेच प्रामाणिक  मत मांडण्यात सोनम कपूर एक पाऊल पुढे आहे. सोशल मीडियावरही अगदी परखडपणे ती तिचे मत मांडत असते. अलीकडे एका शोमध्ये ‘सेक्स आणि बॉयफ्रेंड्स’ या विषयावर सोनमला एक प्रश्न विचारण्यात आला़ हा प्रश्न होता, ‘देवाकडून   सेक्स, पैसा, फेम यांपैकी तू काय मागणार?’ यावर क्षणाचाही विलंब न लावता, मी फेम मागेल, असे सोनम उत्तरली़.

प्रसिद्धी, लोकप्रियता मिळालेली मला नक्कीच आवडेल. लोक मला ओळखतात, ही बाब माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, असे सोनम म्हणाली़ तुला बॉलिवूडमधील कुण्या सहअभिनेत्यासोबत डेटवर जायला आवडेल? असे विचारले असता, कुणासोबतही नाही, असे बिनधास्त उत्तर तिने दिले़ सिंगल असूनही मी कधीही माझ्या सहकलाकारांसोबत डेटवर गेले नाही. इंडस्ट्रीतील अनेकांसोबत माझे चांगले संबंध आहेत. पण मी कधीही त्यांच्यासोबत सेक्स केला नाही, असे ती म्हणाली़

Web Title: Inspired Sonam, unmatched answer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.