झक्कास, अभीं तो मैं जवान हूँ…..अनिल कपूरचा तो VIDEO होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 15:52 IST2021-07-21T15:48:50+5:302021-07-21T15:52:14+5:30
नित्यनियमाने अनिल कपूर व्यायाम करत इतरांनाही प्रेरणा देतात.नित्यनियमाने व्यायाम हेच त्यांच्या फिटनेसचे एकमेव रहस्य आहे.

झक्कास, अभीं तो मैं जवान हूँ…..अनिल कपूरचा तो VIDEO होतोय व्हायरल
आपल्या झक्कास अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेले अभिनेता म्हणजे अनिल कपूर. आजवर विविध सिनेमांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत अनिल कपूर यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. सिनेमात त्यांचे दर्शन घडत नसले तरी, सोशल मीडियावर ते प्रचंड सक्रीय असतात. त्यांचे स्टायलिश फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात.
अनिल कपूर यांचा उत्साह आजच्या तरुण कलाकारांना लाजवेल असाच असल्याचे सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हालाही जाणवेल. आजही अनिल कपूर चिरतरुण असल्याप्रमाणे भासतात. वयाची ६० ओलांडल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर तारुण्याची झळाळी दिसून येते. सध्या सोशल मीडियावर अनिल कपूर यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अनिल कपूर धावत असल्याचे पाहायला मिळतंय. या व्हिडीओमुळे अनिल कपूर किती फिटनेसफ्रिक आहे याचा अंदाज येतो.
तसेच या वयातही त्यांच्यातला हा सळसळता उत्साह पाहून चाहतेही थक्क होत आहेत. व्हिडीओ शेअर होताच चाहतेही थक्क झाले आहेत. नित्यनियमाने अनिल कपूर व्यायाम करत इतरांनाही प्रेरणा देतात.नित्यनियमाने व्यायाम हेच त्यांच्या फिटनेसचे एकमेव रहस्य आहे. तुर्तास हते अनिल कपूर यांचा हा व्हिडीओ पाहून कौतुकाचा वर्षाव करताना दिसतायेत.
अनिल कपूरने हा व्हिडीओ शेअर करत त्याला खास कॅप्शनही दिले आहे. टोक्यो ऑलिम्पिक कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करताच फक्त चाहत्यांनीच नाही तर सेलिब्रेटी देखील कमेंट लाईक्स करताना दिसत आहेत. फराह खाननेही अनिल कपूरचे कौतुक करत म्हटले की, पाजी तुम्हाला तर टोक्यो ऑलिम्पिकमध्येच असायला हवे.