'इंडस्ट्रीत माझ्यावर अन्याय झाला...', मोठा चित्रपट हातातून निसटल्यानंतर प्रतीक बब्बरने सांगितली बॉलिवूडची काळी बाजू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 03:42 PM2023-12-15T15:42:11+5:302023-12-15T15:42:58+5:30

Prateik Babbar : दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले पण त्याच्या आई-वडिलांना मिळालेले स्टारडम त्याला मिळू शकले नाही.

'Injustice was done to me in the industry...', Prateik Babbar told the dark side of Bollywood after a big film slipped out of hand | 'इंडस्ट्रीत माझ्यावर अन्याय झाला...', मोठा चित्रपट हातातून निसटल्यानंतर प्रतीक बब्बरने सांगितली बॉलिवूडची काळी बाजू

'इंडस्ट्रीत माझ्यावर अन्याय झाला...', मोठा चित्रपट हातातून निसटल्यानंतर प्रतीक बब्बरने सांगितली बॉलिवूडची काळी बाजू

जाने तू या जाने ना या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेला अभिनेता प्रतीक बब्बर (Prateik Babbar) याने सिनेइंडस्ट्रीला जवळून बदलताना पाहिले आहे. दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) आणि राज बब्बर (Raj Babbar) यांचा मुलगा प्रतीक बब्बर याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले पण त्याच्या आई-वडिलांना मिळालेले स्टारडम त्याला मिळू शकले नाही. प्रतिक बब्बरने नुकतेच एका मुलाखतीत त्याच्या फिल्मी करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

अभिनेता प्रतीक बब्बरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीत त्याला आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले. त्याने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, मला मिल्खाच्या भूमिकेसाठी लॉक करण्यात आले होते. मला आठवतं रणवीर सिंग ऑडिशन रूममधून बाहेर पडत होता आणि मी आत जात होतो. मग त्याने ऑडिशन्स बंद केल्या कारण ते जे शोधत होते ते त्यांना सापडले होते. प्रसून जोशींसोबत वाचायला सुरुवात केली. मी उदयपूरमध्ये आरक्षणचे शूटिंग करत होतो आणि त्यानंतर राकेश ओमप्रकाश मेहरा मला भेटायला आले. जेव्हा व्यावसायिक लॉक करण्याची वेळ आली तेव्हा माझ्या मॅनेजरने आम्ही हॅण्डल करतो असे सांगितले. तेव्हा मी २३ वर्षांचा होतो, मला पैशाबद्दल कसे बोलावे हे माहित नव्हते. पण माझ्या एजेन्सी बोलत होते. ३ आठवड्यांनंतर मला समजले की फरहान अख्तर ही भूमिका करत आहे. मी अजूनही निराश आहे.

अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता
प्रतिक बब्बरने आपल्या मुलाखतीत सांगितले की, व्यसन हा एक आजार आहे. मी स्वतःला हरवले होते. अभिनेत्याने सांगितले की, 'वयाच्या १८ व्या वर्षी त्याच्या कुटुंबीयांनी त्याला फसवून पुनर्वसन केंद्रात नेले. मी अप्रिय झालो होतो. कोणीही माझ्याशी बोलू शकत नव्हते. मी नेहमी नशेत असायचो. त्यामुळे त्यांनी मला फसवून पुनर्वसनासाठी पाठवले. पुनर्वसन खूप कठीण होते. मी फक्त ओरडायचो आणि रडायचो. मी १८ वर्षांचा होतो आणि त्यामुळे मला भीती वाटली. ते खूप डार्क होते आणि आत्महत्येचे विचार येत होते. मला फक्त माझी आजी हवी होती...'

Web Title: 'Injustice was done to me in the industry...', Prateik Babbar told the dark side of Bollywood after a big film slipped out of hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.