/>अभिनेता बनलेला माजी क्रिकेटर ब्रेट लीने आपल्या ‘अनइंडियन’ या चित्रपटाच्या मुलाखती दरम्यान सांगितले की, ‘आॅस्ट्रेलिया मध्ये रंगभेद नाही, येथे सर्व संंस्कृती आणि रंगाच्या लोकांचे स्वागत आहे.’ या चित्रपटात त्याच्यासोबत काम करणारी भारतीय अभिनेत्री तनिष्ठाचे म्हणण आहे, ‘भारतीय समाज गोऱ्या रंगासाठी वेडा आहे आणि कमर्शियल चित्रपट याच भावनेला हवा देत आहेत. ’ती म्हणते की, ‘आपल्या येथे काजोल, रानी मुखर्जी, बिपाशा बासु, स्मिता पाटील सारखे मोठे स्टार आहेत जे गोरे नव्हते. मात्र तरीही आम्हा सावळ्या लोकांना वेगळ्या पद्धतींच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. आणि फक्त येथेच नाही तर संपूर्ण जगात.’