ग्रॅमी पुरस्कारांमध्ये दिसली भारतीय ‘शक्ती’; ५ जणांचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 08:33 AM2024-02-06T08:33:13+5:302024-02-06T08:34:02+5:30

झाकिर हुसेन, शंकर महादेवन यांच्यासह ५ जणांचा सन्मान

Indian 'Shakti' seen at Grammy Awards; Honor of 5 people | ग्रॅमी पुरस्कारांमध्ये दिसली भारतीय ‘शक्ती’; ५ जणांचा सन्मान

ग्रॅमी पुरस्कारांमध्ये दिसली भारतीय ‘शक्ती’; ५ जणांचा सन्मान

लॉस एन्जेलिस : संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कारांमध्ये यंदा भारताचा दबदबा पाहायला मिळाला. प्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसेन, बासरीवादक राकेश चौरसिया तसेच शंकर महादेवन यांच्यासह तिघांच्या ‘शक्ती’ बॅंडने ग्रॅमी पुरस्कारांवर आपले नाव कोरले. 

झाकिर हुसेन यांनी तीन, तर राकेश चौरसिया यांनी दोन पुरस्कार जिंकले. गायक शंकर महादेवन, व्हायोलिनवादक गणेश राजगोपालन आणि तालवादक सेल्वागणेश विनायकराम यांच्या फ्यूजन संगीत बँड ‘शक्ती’ने ‘धीस मोमेंट’ अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट वैश्विक संगीत अल्बम श्रेणीतील ग्रॅमी पुरस्कार जिंकला. 

चौरसिया यांना दाेन पुरस्कार
हुसेन यांना ‘शक्ती’व्यतिरिक्त ‘पश्तों’साठी सर्वोत्कृष्ट वैश्विक संगीत कलाकृती व ‘एज वुई स्पीक’साठी वाद्य अल्बमचा पुरस्कार मिळाला. 
‘एज वुई स्पीक’साठीच बासरीवादक राकेश चौरसिया यांनी अमेरिकन बेंजोवादक बेला फ्लेक आणि अमेरिकन बासवादक एडगर मेयर यांच्यासह दोन ग्रॅमी पुरस्कार जिंकले.

‘शक्ती’ बँड : १९७३ मध्ये ‘शक्ती’ बँड सुरू झाला व  या बँडने १९७५ मध्ये ‘शक्ती’ हा पहिला अल्बम आणला. 

तुमच्यातील प्रतिभा व संगीताप्रतिच्या समर्पित भावनेने संगीतप्रेमींची मने जिंकली आहेत. तुमच्या यशाचा भारताला अभिमान आहे.     - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Web Title: Indian 'Shakti' seen at Grammy Awards; Honor of 5 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.