भारतीय क्रिकेटर्स ‘ढिशूम’ पाहणार वेस्ट इंडिजमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 11:01 IST2016-08-05T05:31:53+5:302016-08-05T11:01:53+5:30
जॉन अब्राहम आणि वरूण धवन स्टारर ‘ढिशूम’ चित्रपटात क्रिकेटर्सची वस्तुस्थिती दाखविण्यात आली आहे. विशेष म्हणजे मोहिंदर अमरनाथ यांची भूमिकाही ...
.jpg)
भारतीय क्रिकेटर्स ‘ढिशूम’ पाहणार वेस्ट इंडिजमध्ये
जॉन अब्राहम आणि वरूण धवन स्टारर ‘ढिशूम’ चित्रपटात क्रिकेटर्सची वस्तुस्थिती दाखविण्यात आली आहे. विशेष म्हणजे मोहिंदर अमरनाथ यांची भूमिकाही चित्रपटात आहे. त्यांनाही हा चित्रपट भोवला असून चित्रपटाचे कौतुक केले आहे. या गोष्टीची चर्चा भारतीय क्रिकेट संघातही सुरू आहे. म्हणूनच वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघासाठी खास शो आयोजित करु न हा चित्रपट त्यांना दाखविण्याचा निर्णय ‘ढिशूम’च्या टीमने घेतला आहे.
‘संपूर्ण टीमला हा चित्रपट पाहायचा आहे, हे त्यांनी आम्हाला बोलून दाखवले. ते सध्या वेस्ट इंडिजमध्ये आहेत. ते पुढील टेस्ट मॅचसाठी पोर्ट आॅफ स्पेनला जाणार आहेत. तिथेच त्यांच्यासाठी शो आयोजित करायचे आम्ही ठरवले आहे,’ असे दिग्दर्शक रोहित धवन यांनी सांगितले.