बॉलीवूड अभिनेत्रींमध्ये 'रोपोसो'ची वाढती क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 20:07 IST2016-03-23T03:07:11+5:302016-03-22T20:07:11+5:30

महिलांना त्यांच्या लुक्सबद्दल माहिती शेअर करण्यासाठी आणि नवीन ट्रेंड जाणून घेण्यासाठी सक्षम बनविणारे फॅशन सोशल नेटवर्क रोपोसोची क्रेझ दिवसेंदिवस ...

Increasing cramps of 'Roposo' in Bollywood actresses | बॉलीवूड अभिनेत्रींमध्ये 'रोपोसो'ची वाढती क्रेझ

बॉलीवूड अभिनेत्रींमध्ये 'रोपोसो'ची वाढती क्रेझ

िलांना त्यांच्या लुक्सबद्दल माहिती शेअर करण्यासाठी आणि नवीन ट्रेंड जाणून घेण्यासाठी सक्षम बनविणारे फॅशन सोशल नेटवर्क रोपोसोची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असून यात बॉलीवूड अभिनेत्रीदेखील मागे राहिलेल्या नाहीत. सोनाक्षी सिन्हा, बिपाशा बासू, नर्गिस फक्री, यामी गौतम, जॅकलिन फर्नांडिस यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्रींसाठी तर हे नवीन हॉट स्पॉट बनले आहे.


या व्यासपीठावर २० लाखांहून अधिक वापरकर्ते असून जवळपास १००,००० मासिक पोस्ट आणि पोस्ट्सना मिळणारे ४०-५० लाख लाइक्ससह सेलिब्रिटीजना त्यांची फॅशन शैली पसंद करणा-या अस्सल चाहत्यांशी स्वतःला जोडता येते.  या व्यासपीठाची संकल्पना आणि त्याची वाढती लोकप्रियता याकडे आकर्षित होऊन गेल्या ३-४ महिन्यात अनेक सेलिब्रिटीजनी रोपोसोचा वापर सुरु केला आहे. या सोशल मिडीया व्यासपीठावर सोनाक्षी सिन्हाचे जवळपास ११०,००० फॉलोअर्स, नर्गिस फक्रीचे ८०,००० तर जॅकलिन फर्नांडिसचे ७५,००० हून अधिक फॉलोअर्स आहेत.

 

Web Title: Increasing cramps of 'Roposo' in Bollywood actresses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.