IMDbच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत तमन्ना भाटियानं शाहरुख खानला टाकलं मागे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 16:37 IST2023-07-11T16:36:23+5:302023-07-11T16:37:15+5:30

Tamannaah Bhatia : IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत तमन्नाने अव्वल स्थान पटकावले आहे.

In the list of popular Indian celebrities of IMDb, Tamannaah Bhatia left Shahrukh Khan behind! | IMDbच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत तमन्ना भाटियानं शाहरुख खानला टाकलं मागे !

IMDbच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत तमन्ना भाटियानं शाहरुख खानला टाकलं मागे !

अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia) सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. 'जी करदा' वेब सिरीजमधील इंटिमेट दृश्य, 'लस्ट स्टोरीज २' मध्ये बोल्ड अंदाज आणि विजय वर्मासोबत रिलेशन यामुळे तिची सतत चर्चा होत असते. मात्र आता ती वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. IMDbच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत तमन्ना भाटियानंशाहरुख खानला मागे टाकले आहे.

तमन्ना भाटिया हिच्या दोन रिलीज नंतर तिने तिच्या कामात अव्वल ठरली आहे. जी करदा आणि लस्ट स्टोरीज २ च्या यशाने उंच भरारी घेतली असून तिच्या तामिळ चित्रपट जेलर मधलं कावला हे गाणं नुकतंच प्रदर्शित झाले आहे आणि या गाण्याने प्रेक्षकांची मने जिंकली. या गाण्यात तिच्यासोबत ओजी रजनीकांत देखील आहे. आता तमन्नाने आणखी एक पराक्रम केला आहे तो म्हणजे IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत तमन्नाने अव्वल स्थान पटकावले आहे.


तमन्ना भाटियाने 'बॉलिवुडचा किंग खान' शाहरुख खानला मागे टाकले आहे जो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिने मृणाल ठाकूर, कियारा अडवाणी, राम चरण, रणवीर सिंग आणि थलपथी विजय यांनाही मागे टाकून यादीत अव्वल स्थान मिळवले. एक अभिनेत्री म्हणून तिची अष्टपैलुत्व पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले आहे.

आगामी प्रोजेक्ट्स
तमन्ना भाटियाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं तर मल्याळममध्ये 'बांद्रा', 'जेलर' आणि 'अरनमनाई 4' तमिळमध्ये आणि 'भोला शंकर हे चित्रपट करणार आहे.

Web Title: In the list of popular Indian celebrities of IMDb, Tamannaah Bhatia left Shahrukh Khan behind!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.