Koffee with karan 8 शोमध्ये रानी आणि काजोलने करण जोहरच्या नाकात आणला दम, व्हिडीओ चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 04:00 PM2023-11-27T16:00:00+5:302023-11-27T16:07:52+5:30

Koffee with karan 8 : 'कॉफी विथ करण ८' चा आगामी भाग खूप मजेशीर असणार आहे. शोच्या पुढच्या भागात करण जोहरच्या दोन खास पाहुण्या राणी मुखर्जी आणि काजोल धमाल करणार आहेत. करणने या एपिसोडचा एक मजेशीर प्रोमो शेअर केला आहे.

In Koffee with Karan 8 show, Rani and Kajol brought breath to Karan Johar's nose, the video is in discussion | Koffee with karan 8 शोमध्ये रानी आणि काजोलने करण जोहरच्या नाकात आणला दम, व्हिडीओ चर्चेत

Koffee with karan 8 शोमध्ये रानी आणि काजोलने करण जोहरच्या नाकात आणला दम, व्हिडीओ चर्चेत

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर(Karan Johar)चा सर्वात लोकप्रिय शो 'कॉफी विद करण' (Koffee with karan 8) चर्चेत आला आहे. यंदाचा सीझन खूप मजेशीर आहे. शोमध्ये सेलिब्रेटी आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफशी संबधित खुलासा करताना दिसत आहेत. आता शोच्या पुढच्या भागात करण जोहरच्या दोन खास पाहुण्या राणी मुखर्जी (Rani Mukherji) आणि काजोल (Kajol) दिसणार आहेत.

 'कॉफी विद करण ८' या शोचा आगामी भागाचा प्रोमो समोर आला आहे, जो खूपच मनोरंजक आहे. करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शोचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोन्ही बहिणी दिग्दर्शकाचा पाय खेचताना दिसत आहेत.

करणने शेअर केला मजेशीर किस्सा 
या शोमध्ये राणी मुखर्जी करण जोहरला एक्स्पोज करण्यासाठी आली असल्याचे तिचे म्हणणे आहे. हे ऐकून करण जोहर आश्चर्यचकित झाला आणि काजोलने त्याचा आनंद लुटताना म्हटलं, "मला हा शो आधीच आवडला आहे." चाहते या एपिसोडची आतुरतेने वाट पाहत आहेत. या मुलाखती दरम्यान, करण जोहरने एक मनोरंजक किस्सा शेअर केला. तो म्हणताना दिसतोय की, मला आठवते की मी कुछ कुछ होता हैचे शूटिंग करत होतो आणि माझे वडील मेहबूब स्टुडिओच्या बाहेर रस्त्यावर उभे होते आणि बोलत होते. संजय दत्तने विचारले, 'यश जी, तुम्ही इथे काय करत आहात?' ते म्हणाला, 'माझ्या मुलाने सेट लावला आहे आणि मी रस्त्यावर आलो आहे.

कधी पाहायला मिळणार हा एपिसोड?
काजोल पहिल्यांदा या शोमध्ये आलेली नाही. यापूर्वी ती शाहरुख खानसोबत कॉफी विथ करणच्या पहिल्या सीझनमध्ये दिसली होती. सीझन २मध्ये ती शाहरुख खान आणि राणी मुखर्जीसोबत दिसली होती. आता पाहिल्यांदा या शोमध्ये काजोल आणि राणी एकत्र आल्या आहेत. कॉफी विथ करणचा नवीन एपिसोड या गुरुवारी डिस्नी प्लस हॉटस्टारवर पाहायला मिळेल.

 

Web Title: In Koffee with Karan 8 show, Rani and Kajol brought breath to Karan Johar's nose, the video is in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.