‘राज रिबूट’मधील इमरान बघून तुम्हीही घाबराल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 18:52 IST2016-07-05T13:22:53+5:302016-07-05T18:52:53+5:30

इमरान हाश्मी लवकरच विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘राज रिबूट’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक बघून तुम्हालाही घाबरायला ...

Imran in 'Raj Reboot' will be scared of you too! | ‘राज रिबूट’मधील इमरान बघून तुम्हीही घाबराल!

‘राज रिबूट’मधील इमरान बघून तुम्हीही घाबराल!

रान हाश्मी लवकरच विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘राज रिबूट’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक बघून तुम्हालाही घाबरायला होईल. होय, आज या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला. यात डार्क ब्रॅकग्राऊंडसोबत इमरानच्या चेहºयावर लाल रंगाचा लाईट चमकतो आहे आणि त्याच्या दोन्ही डोळ्यांत मानवी प्रतिबिंब दिसते आहे. विक्रम भट्ट यांनी याचे एक पोस्टर टिष्ट्वटरवर शेअर केले आहे. इमरानसोबत अभिनेत्री कृती खरबंदा ही सुद्धा यात आहे. तिचा चेहराही तेवढा भीतिदायक दाखवला आहे. कृतीचा हा पहिला बॉलिवूडपट आहे. भट्ट कॅम्पच्या या चित्रपटात इमरान वॅम्पायरची भूमिका साकारणार आहे. भट्ट कॅम्पने आपल्या हॉरर चित्रपटांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसे पाहता ‘राज’ फ्रेंचाइजीचे चित्रपट चांगलेच गाजले. ‘राज रिबूट’ याच्या चौथ्या सिक्वलचे टायटल आहे. 

Web Title: Imran in 'Raj Reboot' will be scared of you too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.