इमरान खानला आता तरी मिळणार का काम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 11:57 IST2017-01-11T11:57:01+5:302017-01-11T11:57:01+5:30
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या पावलावर पाऊल टाकत त्याचा भाचा इमरान खान बॉलिवूडमध्ये आला होता. मामूसारखेच आपण पण मोठे ...

इमरान खानला आता तरी मिळणार का काम?
ब लिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या पावलावर पाऊल टाकत त्याचा भाचा इमरान खान बॉलिवूडमध्ये आला होता. मामूसारखेच आपण पण मोठे नाव कमवू, सुपरस्टार होऊ, कदाचित हेच इमरानचेही स्वप्न असावे. पण दीर्घकाळापासून इमरान कुठल्याच चित्रपटात दिसला नाही. २०१५ मध्ये ‘कट्टी बट्टी’मध्ये तो अखेरचा दिसला. पण हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला आणि त्यानंतर कुठलाही दिग्दर्शक-निर्माता इमरानच्या घराच्या वाटेने फिरकेनासा झाला. पण कदाचित नव्या वर्षात इमरानचे ग्रह पालटले असावेत. होय, दीर्घकाळानंतर इमरानकडे एका चित्रपटाची आॅफर आलीय म्हणे.
मीडियातील वृत्तानुसार, अनुराग कश्यपची प्रॉडक्शन कंपनी ‘फँटम’च्या बॅनरखाली तयार होणा-या नव्या चित्रपटात इमरान दिसणार आहे. राज सिंह चौधरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करेल. अनुराग कश्यप यांनी राज सिंह चौधरीला ‘गुलाल’ या चित्रपटातून हिरो म्हणून लॉन्च केले होते. राज सिंह चौधरी ‘गुलाल’सोबतच ‘ब्लॅक फ्रायडे’,‘कुछ ना कहो’या सिनेमातही दिसला होता. हाच राजसिंह चौधरी आता दिग्दर्शन करणार आहे आणि त्याच्या पहिल्याच चित्रपटात इमरान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा एक अॅक्शनपट असल्याचे कळतेय. येत्या मे महिन्यात चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे.
२०१५मध्ये आलेल्या ‘कट्टी-बट्टी’ या सिनेमात इमरान खानसोबत कंगना राणौत दिसली होती. केवळ ‘कट्टी-बट्टी’चं नाही तर इमरान खानच्या खात्यात फ्लॉप चित्रपटांची भरमार आहे. कदाचित याचमुळे बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ घालवूनही इमरानला स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करता आले नाही. एकंदर काय तर, इमरानला आता एका चांगल्या हिटची गरज आहे. नव्या वर्षात इमरानला एक ‘हिट’ मिळो, शेवटी हीच कामना करू या!
इमरानने अवंतिका मलिक हिच्याशी २०११ साली विवाह केला. त्यांना इमारा ही मुलगी आहे.