अखेर इम्रान खानला मिळाला चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2017 17:15 IST2017-01-08T17:15:04+5:302017-01-08T17:15:04+5:30

किती वर्षे झालीत ना इम्रान खानला मोठ्या पडद्यावर पाहून!  शेवटचा तो २०१५ साली सप्टेंबरमध्ये रिलीज झालेल्या ‘कट्टी बट्टी’मध्ये दिसला ...

Imran Khan finally got the movie | अखेर इम्रान खानला मिळाला चित्रपट

अखेर इम्रान खानला मिळाला चित्रपट

ती वर्षे झालीत ना इम्रान खानला मोठ्या पडद्यावर पाहून!  शेवटचा तो २०१५ साली सप्टेंबरमध्ये रिलीज झालेल्या ‘कट्टी बट्टी’मध्ये दिसला होता. तो चित्रपट काही चालला नाही. उलट प्रेक्षकांनीच त्याच्याशी कट्टी केली. आता त्याच्या चाहत्यांसाठी खुश खबर आहे.

‘गुलाल’ चित्रपटामध्ये झळकलेला राज सिंग चौधरी हा अभिनेता आता दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरत आहे. तो पदर्पण करीत असलेल्या चित्रपटात इम्रान खान मुख्य अभिनेता असल्याचे कळतेय. राजसिंगने ऐकवलेली स्टोरी इम्रानला प्रचंड आवडेलली असून काम करण्यास तो लगेच तयार झाला.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘इम्रानला काही तरी हटके चित्रपट करायचा होता. जेव्हा त्याने राजसिंगच्या चित्रपटाची पटकथा ऐकली तेव्हा तर तो तिच्या प्रेमातच पडला. राजसिंग बऱ्याच वर्षांपासून दिग्दर्शनात उतरू पाहत होता. या वर्षीच्या मध्यावर शूटींग सुरू होणार असून अनुराग कश्यप निर्माता आहे.’

अद्याप या चित्रपटाचे नाव ठरलेले नसून मुख्य अभिनेत्रीचासुद्धा शोध घेण्यात येत आहे. मध्यंतरी तो विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित ‘भावेश जोशी’ या चित्रपटा काम करणार असल्याची चर्चा होती. मात्र, नंतर तो रोल अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धनकडे गेला.  गेल्या वर्षी ‘मिर्झिया’ चित्रपटातून हर्षवर्धनचा डेब्यू झाला असून तो चित्रपट बॉक्स आॅफिसवर चांगलाच आदळला.

आठ वर्षांपूर्वी ‘जाने तु या जाने ना’ या सिनेमातून पदार्पण करणारा इम्रान इंडस्ट्रीमध्ये स्वत:ला स्थिरावू शकला नाही. ‘आय हे लव्ह स्टोरी’ आणि ‘देल्ही बेली’ यासिनेमांव्यतिरिक्त तो फारशी छाप पाडू शकला नाही. त्याने लहानपणापासूनची मैत्रिण अवंतिकासोबत लग्न केलेले असून त्यांना एक मुलगीदेखील आहे. कुटुंबाला वेळ देण्यासाठी ब्रेक घेत असल्याचे त्याने सांगितले होते.

Web Title: Imran Khan finally got the movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.