संगीत व्हिडिओसाठी इम्रान-इशाची जोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:51 IST2016-01-16T01:16:00+5:302016-02-07T10:51:29+5:30
इशा गुप्ता आणि इम्रान हाश्मीची जोडी लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. भूषण कुमार प्रस्तुत 'मै रहूँ या ना रहूँ..' या ...

संगीत व्हिडिओसाठी इम्रान-इशाची जोडी
इ ा गुप्ता आणि इम्रान हाश्मीची जोडी लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. भूषण कुमार प्रस्तुत 'मै रहूँ या ना रहूँ..' या संगीत व्हिडिओमध्ये ते एकत्र दिसणार आहेत. थोडेसे रोमँन्टिक असलेले हे गीत अमल मलीक यांनी कंपोज केले आहे. गोव्यात या गाण्याचे चित्रीकरण होणार असून, अमित शर्मा दिग्दश्रीत करणार आहेत. अडीच महिन्यांपूर्वी या गाण्याबद्दल मला विचारण्यात आले होते. मात्र, महिनाभरापूर्वीच या गाण्याचे बोल मी ऐकले. ते ऐकून मी त्याच्या प्रेमातच पडलो आणि काम करण्यास देखील तयार झालो. हे गाणं खूप सुंदर असल्याचेही इम्रान हाश्मीने म्हटले आहे.