संजय दत्तने आपल्या बॉलिवूड करिअरबाबत घेतला हा महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 16:16 IST2018-04-09T10:46:44+5:302018-04-09T16:16:44+5:30

संजय दत्त आपल्या बॉलिवूड करिअरला घेऊन एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार संजय दत्त आणि रणबीर कपूर लवकरच ...

This important decision taken by Sanjay Dutt about his Bollywood career | संजय दत्तने आपल्या बॉलिवूड करिअरबाबत घेतला हा महत्त्वाचा निर्णय

संजय दत्तने आपल्या बॉलिवूड करिअरबाबत घेतला हा महत्त्वाचा निर्णय

जय दत्त आपल्या बॉलिवूड करिअरला घेऊन एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार संजय दत्त आणि रणबीर कपूर लवकरच यशराजच्या आगामी एक प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलात, डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूरला करण मल्होत्राने त्याचा आगामी प्रोजेक्टसाठी कास्ट केले आहे. या चित्रपटात संजय दत्तपण दिसणार आहे आणि करण हा चित्रपट यशराज फिल्म्ससाठी तयार करतो आहे.      

रणबीरने 'बचना ए हसीनों' हा चित्रपटात यश राज बॅनरखाली काम केले आहे. तर संजय दत्त पहिल्यांदाच तीन शतकानंतर पहिल्यांदाच यशराजसोबत काम करतो आहे.  मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की संजय दत्त आणि यशराज फिल्मस यांनी एकत्र याआधी कधीच काम केलेले नाही. 

लवकरच संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. यात संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर साकारणार आहे. हा चित्रपट ‘दत्त’ या नावाने प्रदर्शित केला जाईल. चित्रपटाच्या सेटवरून संजय दत्तच्या भूमिकेत असलेल्या रणबीर कपूरचे जेवढे फोटो समोर आले आहेत, त्या सर्व फोटोंमध्ये तो खूपच इम्प्रेसिंग दिसत आहे. कारण रणबीर संजूबाबाच्या लूकमध्ये हुबेहूब बघावयास मिळत असल्याने प्रेक्षक त्याला आतापासूनच संजूबाबा असे म्हणताना दिसत आहेत. हा चित्रपट यावर्षाच्या मोस्ट अवेटेड श्रेणीमध्ये असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता असेल यात शंका नाही. बायोपिकमध्ये रणबीर कपूर तीन वेगवेगळ्या अवतारात दिसणार आहे. हि भूमिका साकाराण्यासाठी रणबीर कपूरने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याला या चित्रपटाकडून अनेक अपेक्षा आहेत. चित्रपटाला विधू विनोद चोपडा प्रोड्यूस करीत आहेत.त्याव्यतिरिक्त विक्की कौशल, सोनम कपूर, दिया मिर्झा, मनीषा कोइराला आणि अनुष्का शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात महेश भट्ट आणि संजय दत्त हेदेखील गेस्ट अपियरेंस करताना बघावयास मिळणार आहे. चित्रपटाला विधू विनोद चोपडा प्रोड्यूस करीत आहेत. चित्रपट २९ जून २०१८ मध्ये प्रदर्शित केला जाईल. 

Web Title: This important decision taken by Sanjay Dutt about his Bollywood career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.