मी रशियन, चीनी, फ्रेंच कुठल्याही चित्रपटात काम करण्यास तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 22:16 IST2016-08-02T16:37:36+5:302016-08-02T22:16:31+5:30
बी- टाऊनची फॅशननिस्टा सोनम कपूर हिची बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख आहे. मुद्दा कुठलाही असो त्यावर परखड मते मांडणे ...
मी रशियन, चीनी, फ्रेंच कुठल्याही चित्रपटात काम करण्यास तयार
ब - टाऊनची फॅशननिस्टा सोनम कपूर हिची बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख आहे. मुद्दा कुठलाही असो त्यावर परखड मते मांडणे हा सोनमचा स्वभाव. आज एका पंजाबी चित्रपटाच्या स्क्रीनिंगला सोनमने हजेरी लावली. साहजिक भविष्यात पंजाबी चित्रपट करणार का? असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी सोनमला विचारला. यावर सोनमचे उत्तर काय असणार? निश्चितपणे होकारार्थीच. होय, कुठल्याही कलाकाराला भाषा बांधून ठेवू शकत नाही. मीही याला अपवाद नाही. स्क्रिप्ट चांगली असेल तर पंजाबीच नाही तर चीनी, हिंदी, मराठी, रशियन, फ्रेंच अशा कुठल्याही भाषेतील चित्रपट करायला मी तयार आहे. माझ्यासाठी भाषा नाही तर चित्रपटातील भूमिका महत्त्वाची आहे. सशक्त भूमिका असेल तर मी कुठल्याही भाषेत चित्रपट करेल, असे सोनम म्हणाली. आता यानंतर सोनम कुठल्या भाषेतील चित्रपट करते, ते बघूयात!