लग्नाशिवाय आई होणार इलियाना डिक्रुझ; पहिल्यांदाच बेबी बंप फ्लॉन्ट करत म्हणाली…

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 04:05 PM2023-05-04T16:05:38+5:302023-05-04T16:06:05+5:30

Ileana D'cruz : अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच, अभिनेत्रीने प्रेग्नेंट असल्याचे सांगितले.

Ileana D'Cruz to be a mother out of wedlock; Flaunting her baby bump for the first time, she said… | लग्नाशिवाय आई होणार इलियाना डिक्रुझ; पहिल्यांदाच बेबी बंप फ्लॉन्ट करत म्हणाली…

लग्नाशिवाय आई होणार इलियाना डिक्रुझ; पहिल्यांदाच बेबी बंप फ्लॉन्ट करत म्हणाली…

googlenewsNext

अभिनेत्री इलियाना डिक्रूझ (Ileana D'cruz ) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नेंसीचीही घोषणा केली, ज्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. दरम्यान, आता अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचा बेबी बंप दाखवत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अभिनेत्री इलियाना डिक्रूजने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री तिच्या पाळीव कुत्र्यासोबत बेडवर आराम करताना दिसत आहे. यासोबतच तिच्या हातात कॉफीचा मग आहे आणि ती कॉफीचे घोट घेत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीनं गाऊन घातलेला दिसत आहे. इतकंच नाही तर या व्हिडिओमध्ये अभिनेत्री इलियानानेही तिच्या बेबी बंपची झलक दाखवली आहे. यासोबतच या व्हिडिओला कॅप्शन देताना इलियानाने लिहिले आहे की- "आयुष्य नुकतेच."

प्रेग्नेंसी क्रेविंग्सची झलकदेखील केली शेअर
अभिनेत्रीने नुकतेच तिच्या गरोदरपणाच्या क्रेविंग्सची झलकही शेअर केली होती. ज्यामध्ये तिने बहिणीने बनवलेल्या केकचा फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीने अद्याप तिच्या भावी मुलाच्या वडिलांची ओळख करुन दिलेली नाही.

अभिनेत्री दिलं हे कॅप्शन
इतकंच नाही तर अभिनेत्रीने नुकतीच माहिती दिली होती की ती आई होणार आहे. अभिनेत्री इलियानाने इन्स्टावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्रीने लिहिले आहे की, "लवकरच येत आहे, मी तुला भेटण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही, माझ्या प्रिय."

जीवनातल्या गोष्टी खासगी ठेवायला अभिनेत्री देते प्राधान्य
अभिनेत्रीला नेहमीच आपले आयुष्य खासगी ठेवायला आवडते. त्याचवेळी, यापूर्वीच्या अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की इलियाना कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलला डेट करत आहे आणि त्यांच्या नात्याच्या अफवा पसरल्या आहेत.

Web Title: Ileana D'Cruz to be a mother out of wedlock; Flaunting her baby bump for the first time, she said…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.