इलियाना डिक्रूजने उरकले गूपचूप लग्न! बॉयफ्रेन्डला म्हटले हबी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 14:27 IST2017-12-25T08:49:20+5:302017-12-25T14:27:01+5:30

इलियाना डिक्रूज म्हणजे बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री. इलियाना कधीच आपल्या खासगी आयुष्याबद्दल फार काही लपवताना दिसत नाही. त्यामुळेच इलियानाच्या आयुष्यात ...

Ileana D'Cruz is happy to get married! Boyfriend called Habee !! | इलियाना डिक्रूजने उरकले गूपचूप लग्न! बॉयफ्रेन्डला म्हटले हबी!!

इलियाना डिक्रूजने उरकले गूपचूप लग्न! बॉयफ्रेन्डला म्हटले हबी!!

ियाना डिक्रूज म्हणजे बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री. इलियाना कधीच आपल्या खासगी आयुष्याबद्दल फार काही लपवताना दिसत नाही. त्यामुळेच इलियानाच्या आयुष्यात प्रेम आले आणि तिने ते सगळ्यांसमोर मान्य केले. आपल्या बॉयफ्रेन्डसोबतचे फोटो शेअर करतानाही ती  संकोचली नाही.   पण कदाचित लग्नाची बातमी शेअर करताना इलियाना कचरली. होय, इलियानाने गुपचूपपणे लग्न केल्याची खबर आहे. बॉयफ्रेन्ड अ‍ॅन्ड्र्यू नीबोनसोबत इलियानाने लग्न केल्याचे कळतेय. खरे याआधीही इलियानाच्या सीक्रेट मॅरेजच्या बातम्या आल्या आहेत. पण आता या बातमीला ठोस आधार आहे. हा आधार म्हणजे, इलियानाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला ताजा फोटो. होय, या फोटोद्वारे इलियानाने सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि विशेष म्हणजे, या फोटोच्या कॅप्शनमध्ये बॉयफ्रेन्ड अ‍ॅन्ड्र्यूचा उल्लेख ‘हबी’ असा केला आहे. फॅमिली फोटो बाय हबी, असे कॅप्शन इलियानाने या फोटोला दिले आहे. या फोटोवरून इलियानाने अ‍ॅन्ड्र्यूसोबत गुपचूप लग्न उरकल्याचे मानले जात आहे.  



इलियानाचा बॉयफ्रेन्ड अ‍ॅन्ड्र्यू एक फोटोग्राफर आहे. आॅस्ट्रेलियात राहणा-या अ‍ॅन्ड्र्यूला इलियानाचे फोटो काढणे आवडते. इलियानाचे अनेक फोटो त्याने काढले आहेत. विशेष म्हणजे, इलियानाने यापैकी अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी इलियानाचा बाथटममधील न्यूड फोटो चांगलाच गाजला होता. अ‍ॅन्ड्र्यूनेच तिचे हे हॉट फोटोशूट केले होते.



सध्या या दोघांची लव्हस्टोरी गाजत असताना यापूर्वीही एकदा या लव्हबर्ड्सनी गूपचूप लग्न केल्याची बातमी आली होती. अर्थात तेव्हा ही बातमी निव्वळ अफवा ठरली होती . पण आता ही अफवा नसून खरोखरीच हे लव्हबर्ड्स लग्नाच्या बेडीत अडकल्याचे दिसतेय. आता इलियाना या लग्नाची अधिकृत घोषणा कधी करते ते बघूच.

ALSO READ : shocking!! ​त्या काळात इलियाना डिक्रूजच्या मनात रोज यायचे आत्महत्येचे विचार!

अलीकडे एका मुलाखतीत इलियानाला लग्नाबद्दल विचारले असता, कधीकधी सस्पेंस आवश्यक असतो, असे इलियाना म्हणाली होती. मी सगळचं जगजाहिर करायला लागले तर लोकांना माझ्यात काय इंटरेस्ट उरेल, असे ती म्हणाली होती.  

Web Title: Ileana D'Cruz is happy to get married! Boyfriend called Habee !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.