IIFA 2017 : ए. आर. रहमानच्या ‘उर्वशी-उर्वशी’ला वन्समोर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2017 21:15 IST2017-07-15T15:45:39+5:302017-07-15T21:15:39+5:30
संपूर्ण न्यू यॉर्क शहर सध्या ‘आयफा’मय झाले असून, आॅस्कर विजेता संगीतकार ए. आर. रहमान याने ‘उर्वशी-उर्वशी’ हे गाणे तामिळमध्ये ...
IIFA 2017 : ए. आर. रहमानच्या ‘उर्वशी-उर्वशी’ला वन्समोर!!
स पूर्ण न्यू यॉर्क शहर सध्या ‘आयफा’मय झाले असून, आॅस्कर विजेता संगीतकार ए. आर. रहमान याने ‘उर्वशी-उर्वशी’ हे गाणे तामिळमध्ये गाऊन या महासोहळ्यात आणखीच रंगत आणली. रहमानचा परफॉर्मन्स असा काही होता की, प्रेक्षकांकडून वारंवार वन्समोरची मागणी केली जात होती. रहमानने तब्बल दोन तास संगीत कार्यक्र्रम सादर करून बॉलिवूडमधील त्याच्या २५ वर्षांच्या वाटचालीचा संगीतमय प्रवास उपस्थितांसमोर मांडला.
![]()
न्यू जर्सी येथील मेटलाइफ स्टेडियममध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा अंदाज ८ जुलै रोजी लंडन येथे झालेल्या कॉन्सर्टपेक्षा अगदीच वेगळा होता. कारण लंडन येथील कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांच्या तक्रारीचा रहमानला सामना करावा लागला होता. रहमानने हिंदीऐवजी तामिळमध्येच गाणी गायिले अशी तक्रार उपस्थितांनी केली होती. काहींनी तर उघड उघड नाराजी दाखवित कॉन्सर्टमधून काढता पाय घेतला होता. मात्र आयफाची कॉन्सर्ट लंडन कॉन्सर्टच्या तुलनेत पूर्णत: विभिन्न होती. कारण रात्रीचे दोन वाजले असतानाही मेटलाइफ स्टेडियममध्ये ‘वन्समोर-वन्समोर’च्या घोषणा ऐकावयास मिळत होत्या.
![]()
उपस्थितांचा उत्साह बघून रहमानदेखील हरकून गेला होता. अखेर त्यानेच ‘आता खूप उशीर झाला आहे’ असे म्हणत उपस्थितांची समजूत काढली. मात्र अशातही प्रेक्षकांकडून ‘वन्समोर’चा नारा दिला जात असल्याने त्याने ‘हम्मा-हम्मा’ हे गाणे गाण्यास सुरुवात केली. या संगीत कार्यक्रमात हरिहरन, कैलास खैर, जोनिता गांधी, बेनी दयाल, मीका सिंग आणि नीति मोहन यांनीही गाणी गात वातावरणात रंगत आणली. यावेळी रहमान याने सर्वाधिक हिंदी गाणी गायिली. मात्र आपल्या मातृभाषेत चार-पाच गाणी गाण्याचेही तो विसरला नाही.
![]()
जेव्हा रहमानचा कार्यक्रम संपला तेव्हा अनेकांनी त्याच्या कार्यक्रमाचे कौतुक केले. ‘रहमानचा परफॉर्मन्स खूपच चांगला होता. त्याने तामिळमध्ये जरी गायिले असले तरी, आम्हाला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. उलट प्रत्येकालाच त्याच्या संस्कृतीचा आदर असायला हवा. आम्ही या कार्यक्रमाचा पूर्ण आनंद लुटला. संगीत हे सार्वभौम असते, त्यामुळे कुठल्या भाषेत गायिले जात आहे, याचा विचार करणे फारसे संयुक्तिक ठरत नाही. अशाही काही प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
![]()
रहमानच्या या संगीत कार्यक्रमात सलमान खान, आलिया भट्ट, कॅटरिना कैफ, वरुण धवन यांसारखे सेलिब्रिटीदेखील बघावयास मिळाले. यावेळी रितेश देशमुख आणि मनीष पॉल यांनी कॉमेडीचा तडका लावीत कार्यक्रमात रंगत आणली. एकूणच आयफा रॉक्स संगीत कार्यक्रमाची प्रेक्षकांवर मोहिनी पडली.