IIFA 2017 : बॉलिवूडमधील घराणेशाही...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST2017-07-21T12:04:09+5:302018-06-27T20:17:07+5:30

बॉलिवूड विश्वात घराणेशाहीच्या मुद्याला एका अर्थी अभिनेत्री कंगणा रणौतनेच वाचा फोडली. तिच्या एका वक्तव्यामुळे थेट आयफा पुरस्कार सोहळ्यामध्येही तिच्यावर निशाणा साधण्यात आला. करण जोहर, सैफ अली खान आणि वरुण धवन यांच्या स्किटमधून कंगनावर उपरोधिक टिका करण्यात आली. त्याचं झालं असं की, ‘वरूण धवनला ‘बेस्ट अ‍ॅक्टर इन कॉमिक रोल’चा अवॉर्ड मिळाल्यावर करण जोहर कंगनाला लक्ष्य करताना दिसला. ‘मी माझ्या वडिलांमुळे इथे आहे, सैफ त्याच्या आईमुळे तर वरूण आपल्या वडिलांमुळे...व्हॉट अ बिग डिल?’, असे तो म्हणाला. हाच धागा पकडून सैफ ‘बोले चूडियां, बोले कंगना...’ असे गाऊ लागला. ‘करण-कंगना’ हा वाद तर बॉलिवूडचा सर्वांत हॉट वादांपैकी एक आहे. आता मुद्दा हा आहे की, ‘बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या आई-वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून सध्या करिअर करत आहेत. असे किती कलाकार आहेत जे त्यांचे घराणे मिरवतात. घेऊया अशा काही कलाकारांचा आढावा...’

IIFA 2017: Dynasty in Bollywood ...! | IIFA 2017 : बॉलिवूडमधील घराणेशाही...!

IIFA 2017 : बॉलिवूडमधील घराणेशाही...!

लिवूड विश्वात घराणेशाहीच्या मुद्याला एका अर्थी अभिनेत्री कंगणा रणौतनेच वाचा फोडली. तिच्या एका वक्तव्यामुळे थेट आयफा पुरस्कार सोहळ्यामध्येही तिच्यावर निशाणा साधण्यात आला. करण जोहर, सैफ अली खान आणि वरुण धवन यांच्या स्किटमधून कंगनावर उपरोधिक टिका करण्यात आली. त्याचं झालं असं की, ‘वरूण धवनला ‘बेस्ट अ‍ॅक्टर इन कॉमिक रोल’चा अवॉर्ड मिळाल्यावर करण जोहर कंगनाला लक्ष्य करताना दिसला. ‘मी माझ्या वडिलांमुळे इथे आहे, सैफ त्याच्या आईमुळे तर वरूण आपल्या वडिलांमुळे...व्हॉट अ बिग डिल?’, असे तो म्हणाला. हाच धागा पकडून सैफ ‘बोले चूडियां, बोले कंगना...’ असे गाऊ लागला. ‘करण-कंगना’ हा वाद तर बॉलिवूडचा सर्वांत हॉट वादांपैकी एक आहे. आता मुद्दा हा आहे की, ‘बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या आई-वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून सध्या करिअर करत आहेत. असे किती कलाकार आहेत जे त्यांचे घराणे मिरवतात. घेऊया अशा काही कलाकारांचा आढावा...’
* मिजान जाफरी जावेद जाफरी याचा मुलगा मिजान जाफरी हा आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. संजय लीला भन्साळी हे त्यांच्या आगामी ‘पद्मावती’ चित्रपटातून लाँच करणार आहेत. त्यामुळे पहिल्याच चित्रपटात त्याला बॉलिवूडच्या मोठमोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. अलीकडेच तो अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा हिच्यासोबत पार्टी करताना दिसला. थोडक्यात काय तर, जावेद जाफरीमुळेच तो बॉलिवूडमध्ये आलाय.

* जान्हवी कपूर नव्या पिढीचा विषय म्हटल्यावर जान्हवीचे नाव विसरून कसे चालेल? दिग्दर्शक बोनी कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर ही लवकरच एका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिने बॉलिवूडमध्येच काम करून घराण्याचा झेंडा मिरवावा असे खुद्द बोनी आणि श्रीदेवी यांचीच इच्छा आहे.

* सारा अली खान सध्या सारा अली खानच्या बॉलिवूड डेब्यूवरून सैफ-अमृता सिंग -करिना कपूर खान यांच्यात बºयाचशा चकमकी उडत असताना दिसत आहेत. तिने बॉलिवूडमध्ये काम करावे की नको? या एकाच विषयावरून वाद सुरू आहे. पण, सैफ आणि करिना हे दोघेही तिचे आई-वडील म्हणून तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. घराण्याचे नाव पुढे नेण्यासाठी सारा आता उमेदवार आहे.

* आलिया भट्ट ‘बॉलिवूडची चुलबूली गर्ल’ आलिया भट्ट हिने ‘उडता पंजाब’,‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’,‘शानदार’ अशा अनेक चित्रपटांमध्ये उत्कृ ष्ट कामगिरी केली आहे. तिचा बॉलिवूडमधील आत्तापर्यंतचा प्रवास पाहिल्यावर ती एक जाणकार आणि अभिनयसंपन्न अभिनेत्री असल्याचं लक्षात येतं. तिचे वडील महेश भट्ट यांच्या मार्गदर्शनानुसार तिने बॉलिवूडमध्ये पाय रोवले. अर्थात तिचे वडील तिच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्याने ती सध्याची उत्कृष्ट अभिनेत्री स्वत:ला म्हणवून घेते.

* सोनाक्षी सिन्हा ‘खामोश’ म्हणणारे शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा ही सध्याची टॉपची अभिनेत्री आहे. तिनेही बॉलिवूडमध्ये सिन्हा कुटुंबियांच्या सहकार्याने, पाठिंब्याने पदार्पण केले. आजही ती विविध चित्रपटांमध्ये उत्कृष्ट आणि निवडक भूमिका करताना दिसतेय.

* वरूण धवन ‘बॉलिवूडचा हॅण्डसम हिरो’ म्हणून आपण वरूण धवन याला ओळखतो. दिग्दर्शक डेव्हिड धवन याचा मुलगा म्हणून वरूणला वरचेवर अनेक संधी मिळत गेल्या. तो एक उत्कृष्ट कलाकार म्हणूनच नव्हे तर आगामी काळातील उत्तम अभिनेता म्हणून देखील ओळखला जाणार आहे. वरूणने डेव्हीड धवन यांच्या मार्गदर्शनाखाली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तसेच त्याची घौडदौड अजूनही सुरूच आहे.

Web Title: IIFA 2017: Dynasty in Bollywood ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.