सणासुदीत सौंदर्य फुलवायचे असेल तर कल्की कोचलीनने दिलेला सल्ला वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 19:45 IST2017-09-28T14:14:34+5:302017-09-28T19:45:30+5:30
अभिनेत्री कल्की कोचलीन हिला सणासुदीचे दिवस खूपच आवडतात. तिला असे वाटते की, या दिवसांचे एक वेगळेच आकर्षण आहे. यादरम्यान ...

सणासुदीत सौंदर्य फुलवायचे असेल तर कल्की कोचलीनने दिलेला सल्ला वाचा!
अ िनेत्री कल्की कोचलीन हिला सणासुदीचे दिवस खूपच आवडतात. तिला असे वाटते की, या दिवसांचे एक वेगळेच आकर्षण आहे. यादरम्यान ती मॅचिंग दागिने आणि पारंपरिक किंवा सेमी ट्रेडिशनल कपडे परिधान करण्याचा आनंद घेतले. कल्कीने ईमेलच्या माध्यमातून आयएएनएसला सांगितले की, ‘मला सणासुदीचे दिवस खूप आवडतात. या दिवसांमध्ये माझ्यात एकच जोश आणि उत्साह असतो. याचा आनंद घेण्यासाठी माझ्यात वेगळेच आकर्षण निर्माण होते. या दिवसांमध्ये लोक एकत्र येतात आणि आनंदाची उधळण करतात. यादरम्यान मी काही एथनिक आणि जुन्या शैलीचे दागिने तसेच पारंपरिक व सेमी ट्रेडिशनल कपडे परिधान करणे पसंत करते. पुढे बोलताना कल्कीने सांगितले की, जेव्हा मेकअपचा विषय येतो तेव्हा मी डार्क काजळ, मस्करा आणि लाल लिपस्टिक लावते. यावेळी कल्कीने तिच्या चाहत्यांना काही टिप्सही दिल्या आहेत.
- चमकदार आणि फ्लॉलेस स्किनसाठी चेहरा स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी चांगल्या कंपनीचा क्लिंजर, जेल किंवा फेसवॉशचा वापर करायला हवा. मी चेहºयावरून धूळ स्वच्छ करण्यासाठी दिवसातून किमान तीनदा क्लिंजरचा वापर करते.
- मी अनावश्यक केस काढण्यासाठी पार्लरमध्ये वेळ घालवित नाही. शिवाय हानीकारक क्रिम्स आणि वेदनादायी वॅक्सिंगपासून दूर राहते. मी शेविंग करणे पसंत करते, कारण यामुळे वेदना होत नाही.
- सणासुदीच्या काळात चेहºयावर निखळ सौंदर्य आणण्यासाठी नारळाचे पाणी खूप प्यावे. यामुळे चेहºयावरील ताजेतवाणेपणा कायम राहतो. याशिवाय दिवसातून किमान ७ ते ८ ग्लास पाणी प्यावे.
- उजळ चेहºयासाठी ८ ते ९ तास झोप घ्यावी. त्यामुळे चेहºयावरील सौंदर्य आणखी खुलून दिसते.
-सणासुदीच्या काळात बहुतांश लोक खरेदी करण्यास प्राधान्य देतात. अशावेळी कडक उन्हापासून स्वत:चा बचाव करायला हवा. सूर्याची किरणे चेहºयाला नुकसान पोहोचवू शकतात. अशावेळी स्कार्पचा वापर करायला हवा.