सलमान नंतर सोहेल खाननेही दिले राखी सावंतला मदत करण्याचे वचन म्हणाला.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 18:16 IST2021-02-27T18:12:58+5:302021-02-27T18:16:31+5:30
आर्थिक अडचणींमुळे त्यांचा योग्य प्रकारे उपचार होत नव्हता. राखी सावंतने आईचे फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहून कोणत्याही संवेदनशील मनाला पाझर फुटावा.

सलमान नंतर सोहेल खाननेही दिले राखी सावंतला मदत करण्याचे वचन म्हणाला.....
बिग बॉस १४ मध्ये ड्रामा क्वीन राखी सावंतने आपल्या मजेशीर अंदाजात सा-यांचे भरभरुन मनोरंजन केले.गेले तीन महिने सतत चाहत्यांचे मनोरंजन करणारी राखी शो संपल्यानंतर आता आईची सेवा करण्यात बिझी झाली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आईची अवस्था पाहून राखीला धक्का बसला होता. आईचे फोटो शेअर करत, तिने तिच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली होती. दरम्यान राखीच्य मदतीला भाईजान सलमान खान धावून आला. त्याने राखीच्या आईच्या उपचारासाठी मदत केली आहे. दरम्यान राखीने तिच्या आईचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
यात राखीची आई सलमान खानचे आभार मानताना दिसतेय. ‘सलमानजी, थँक्यू बेटा. सोहलजी थँक्यू. सध्या किमो सुरु आहे. मी हॉस्पीटलमध्ये आहे. आज चौथा किमो झाला, आणखी दोन बाकी आहेत. यानंतर ऑपरेशन होईल. तुम्हाला परमेश्वर खूप यश देवो, तुम्हाला आनंद देवो,’असे राखीची आईने या व्हिडीओत म्हटलेय. राखी सावंत मदतीला ज्याप्रमाणे सलमान धावून आला अगदी तसेच सोहेलनेही राखीला मदतीचे वचनच दिले आहे.
''राखी तू काळजी करु नकोस मी तुझ्यासोबत आहे. जेव्हा कधी तुला मदत हवी असेल तेव्हा तू मला थेट फोन कर''. मी तुझ्या आईला भेटलेलो नाही. पण तुझी आई नक्कीच तुझ्यासारखी धाडसी आहे त्यामुळं इतक्या मोठ्या आजाराचा सामना करतानाही तिनं आपलं धैर्य गमावलेलं नाही. आई लवकर बरी होईल. माझ्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहेत.” अशा आशयाचा संदेश सोहेलनं राखीला दिला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
राखीची आई जया या गेली अनेक वर्ष कर्करोगामुळं त्रस्त आहेत. आर्थिक अडचणींमुळे त्यांचा योग्य प्रकारे उपचार होत नव्हता. राखीने आईचे फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहून कोणत्याही संवेदनशील मनाला पाझर फुटावा. राखीचे चाहतेही हे फोटो पाहून भावूक झालेत. अनेकांनी राखीच्या आईसाठी प्रार्थना केली. याचवेळी अनेकांनी राखीच्या हिंमतीचीही दाद दिली. व्यक्तिगत आयुष्यात इतक्या अडचणी असूनही राखीने कायम लोकांचे मनोरंजन केले, असे लिहित चाहत्यांनी तिचे कौतुक केले.