तुम्ही प्रियांका चोप्रा आणि आमीर खानचे फॅन्स आहात तर ही बातमी नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 16:16 IST2017-10-10T10:43:24+5:302017-10-10T16:16:02+5:30

प्रियांका चोप्रा मागच्या काही दिवसांपासून खूप बिझी आहे. क्वांटिको सारख्या टीव्ही सीरिजमध्ये आणि बेवॉट सारख्या हॉलिवूड चित्रपटांमुळे तिला बॉलिवूडमधल्या ...

If you are a fan of Priyanka Chopra and Aamir Khan, then read this news exactly | तुम्ही प्रियांका चोप्रा आणि आमीर खानचे फॅन्स आहात तर ही बातमी नक्की वाचा

तुम्ही प्रियांका चोप्रा आणि आमीर खानचे फॅन्स आहात तर ही बातमी नक्की वाचा

रियांका चोप्रा मागच्या काही दिवसांपासून खूप बिझी आहे. क्वांटिको सारख्या टीव्ही सीरिजमध्ये आणि बेवॉट सारख्या हॉलिवूड चित्रपटांमुळे तिला बॉलिवूडमधल्या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी वेळ नाही आहे. आमच्याकडे प्रियांकाच्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. प्रियांका लवकरच बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. आम्ही तुम्हाला याआधीच सांगितले होते की प्रियांका आमीर खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. अंतराळवीर कल्पना चावलाच्या बायोपिकमध्ये प्रियांका चोप्रा दिसणार आहे. याचबरोबर आणखीन एका चित्रपटात प्रियांका झळकणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार  प्रियांका आमीरचा 'सैल्यूट' चित्रपटाचा भाग बनू शकते. यात आमीर खान अंतराळवीर राकेश शर्मा यांची भूमिका साकारणार आहे. याच चित्रपटात प्रियांका त्याच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. याचे दिग्दर्शन महेश मथाई करणार आहेत. हा चित्रपट जर प्रियांकाने साईन केला तर पहिल्यांदा दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार प्रियांका चोप्राला या चित्रपटाचा भाग बनायचे आहे. तिला या चित्रपटाचा विषय आवडला आहे. 

प्रियांका चोप्रा सैल्यूटचे शूटिंग सुरु करण्यापूर्वी कल्पना चावल्या बायोपिकचे शूटिंग आधी सुरु करणार आहे. सध्या या चित्रपटाचे प्री-प्रोडक्शनचे काम सुरु होण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्रियांकाने या चित्रपटाच्या मेकर्सची भेट घेतली आहे, आणि प्री-प्रोडक्शनच्या कामाला सुरुवात करायला सांगितली आहे. त्याच बरोबर प्रियांका क्वांटिको सीजन 3 चे शूटिंग सुद्धा करते आहे ज्याचे शूटिंग पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला संपले. ज्यानंतर ती बॉलिवूडमध्ये कॅमबॅक करण्याची शक्यता आहे. 

ALSO READ : -म्हणून अभिषेक बच्चनची हिरोईन बनण्यास प्रियांका चोप्राने दिला नकार?

प्रियांकाने बॉलिवूड प्रमाणे हॉलिवूडमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाच्या जोरावर आपले वेगळे स्थान निर्माण केले. बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा जगातील सर्वाधिक कमाई करणारी आठव्या क्रमांकाची टीव्ही अभिनेत्री बनली आहे. जगातील सर्वाधिक कमाई करणा-या टॉप टीव्ही अभिनेत्रींच्या यादीत प्रियांकाने आठवे स्थान मिळवले आहे. फोर्ब्सची ही यादी १ जून २०१६ ते १ जून २०१७ या काळात अभिनेत्रींनी केलेल्या कमाईवर आधारित आहे. 

Web Title: If you are a fan of Priyanka Chopra and Aamir Khan, then read this news exactly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.