...तर पांढऱ्या रंगाच्या सलवार-सूटमुळे झाली तब्बू, सोनाली बेंद्रेची निर्दोष मुक्तता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 19:32 IST2018-04-06T14:02:58+5:302018-04-06T19:32:58+5:30

काळवीट शिकार प्रकरणात अभिनेत्री तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांच्यावरही आरोप होता. परंतु गुरुवारी (५ एप्रिल) जोधपूरच्या जिल्हा व सत्र ...

If the white salwar sukayata due to Tabu, Sonali Bendrea innocent acquitted? | ...तर पांढऱ्या रंगाच्या सलवार-सूटमुळे झाली तब्बू, सोनाली बेंद्रेची निर्दोष मुक्तता?

...तर पांढऱ्या रंगाच्या सलवार-सूटमुळे झाली तब्बू, सोनाली बेंद्रेची निर्दोष मुक्तता?

ळवीट शिकार प्रकरणात अभिनेत्री तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांच्यावरही आरोप होता. परंतु गुरुवारी (५ एप्रिल) जोधपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना दोघींचीही निर्दोष मुक्तता केली. विशेष म्हणजे, दोघीही या प्रकरणातून एका खास कारणामुळे निर्दोष सुटल्या. होय, सुनावणीदरम्यान एक प्रमुख साक्षीदार त्यांना ओळखण्यास अपयशी ठरला. कारण त्यांनी पांढºया रंगाचा सूट घातल्यानेच त्यांची ओळख पटविता आली नाही. यावेळी या साक्षीदाराने सैफ अली खानला ओळखले, मात्र हे सिद्ध होऊ शकले नाही की बंदुकीतून गोळी सैफने चालविली होती की त्याने सलमानला असे करण्यास उद्युक्त केले होते. 

दरम्यान, गेल्या गुरुवारी १९९८ मध्ये घडलेल्या काळवीट शिकार प्रकरणाचा निर्णय समोर आला. जोधपूरच्या जिल्हा न्यायालयाने सलमानला दोषी ठरविताना पाच वर्षांची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला, तर या प्रकरणातील अन्य संशयित आरोपी सैफ, तब्बू, सोनाली आणि नीलमची निर्दोष मुक्तता केली. पूनमचंद बिश्नोई यांनी सलमानसह अन्य बॉलिवूड कलाकारांवर या प्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान तब्बू आणि सोनालीलाही हजर करण्यात आले. याठिकाणी पूनमचंद या दोघींना ओळखू शकले नाही. न्यायाधीशांनी, एफआयआरमध्ये दोघींच्या नावांचा समावेश असतानाही तुम्ही त्यांना का ओळखू शकले नाहीत, असे पूनमचंदला विचारले असता त्यांनी म्हटले की, त्यावेळी सलमानसोबत ज्या महिला होत्या त्यांनी पांढºया रंगाचा सलवार सूट परिधान केला होता. 

पुढे त्यांनी सैफची ओळख पटविली. त्यांनी दावा केला की, त्यावेळी सैफ जीपमध्ये पुढे बसला होता. मात्र त्यांना हे सिद्ध करता आले नाही की, गोळी सैफनेच चालविली होती, की त्याने सलमानला गोळी चालविण्यास प्रवृत्त केले. पूनमचंदच्या मते, घटनेदरम्यान मी माझ्या मोटारसायकलवर स्वार होतो. जवळपास शंभर मीटरवरून मी हा सर्व प्रकार बघत होतो. त्यावेळी सलमानने गोळी चालविल्याचे मी स्पष्ट बघितले. सलमानच्या वकिलाने यावर प्रश्न उपस्थित करताना पूनमचंदला विचारले की, ‘अंधारात मोटारसायकलच्या प्रकाशात शंभर मीटरच्या अंतरावरून दृश्य बघता येऊ शकते काय?’ त्यावर पूनमचंदने म्हटले की, ‘घटनेच्या रात्री चंद्राचा चांगला प्रकाश पडला होता. त्यामुळे माझी साक्ष ग्राह्य धरली जावी.’ त्यावर बचाव पक्षाकडून सांगण्यात आले की, त्या रात्री दीड वाजता चंद्र अस्ताला गेला होता, तर ही घटना रात्र दोन वाजता घडली. 

Web Title: If the white salwar sukayata due to Tabu, Sonali Bendrea innocent acquitted?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.