ठरलं तर मग..! केएल राहुल आणि अथिया शेट्टी या दिवशी बांधणार लग्नगाठ, आउटफिटही झाले फायनल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 14:01 IST2022-11-23T14:01:05+5:302022-11-23T14:01:49+5:30
KL Rahul And Athiya Shetty : केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता या दोघांच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे.

ठरलं तर मग..! केएल राहुल आणि अथिया शेट्टी या दिवशी बांधणार लग्नगाठ, आउटफिटही झाले फायनल
क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) त्यांच्या रिलेशनशीपमुळे सातत्याने चर्चेत येत असतात. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. सुनील शेट्टीनेही अथिया आणि केएल राहुलच्या नात्याला दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा सुनील शेट्टी म्हणाला होता की, अथिया लवकरच लग्न करणार आहे. आता अभिनेत्रीच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे.
केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता या दोघांच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, लव्हबर्ड्स केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. जानेवारी २०२३ मध्ये दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. इतकंच नाही तर लग्नाचं ठिकाण आणि लग्नाचे पोशाखही ठरवण्यात आले आहेत.
केएल राहुल आणि अथियाचे लग्न कोणत्याही हॉटेलमध्ये नसून खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या बंगल्यात होणार असल्याचे बोलले जात आहे. बंगल्यावर लग्नाची तयारीही सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केएल राहुल आणि अथियाने त्यांच्या लग्नाचे आउटफिटही फायनल केले आहेत. मात्र, जानेवारीत ते कोणत्या तारखेला लग्न करणार आहेत हे अद्याप कळू शकलेले नाही. हे कळल्यानंतर आता प्रत्येकजण या खास दिवसाची वाट पाहत आहे.
२०२१ मध्ये तडप चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान अथिया आणि केएल राहुलचे नाते अधिकृत झाले. अथियाने तिच्या भावाच्या डेब्यू चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये केएल राहुलसोबत एन्ट्री घेतली. यादरम्यान सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. यानंतरच अथिया आणि केएल राहुल एकमेकांना डेट करत असल्याचे कन्फर्म झाले.
अथिया शेट्टी आणि केएल राहुल सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मानंतर आता चाहते केएल राहुल-अथियाच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.