इब्राहिमचा फोटो बघून फिमेल फॅन्स झाल्या फिदा, लग्नासाठी येऊ लागले प्रपोजल

By गीतांजली | Updated: November 17, 2020 12:58 IST2020-11-17T12:40:51+5:302020-11-17T12:58:02+5:30

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय आहे.

Ibrahim ali khan shares diwali pics female fans come with marriage proposals | इब्राहिमचा फोटो बघून फिमेल फॅन्स झाल्या फिदा, लग्नासाठी येऊ लागले प्रपोजल

इब्राहिमचा फोटो बघून फिमेल फॅन्स झाल्या फिदा, लग्नासाठी येऊ लागले प्रपोजल

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय आहे. बर्‍याच दिवसांपासून त्याच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा आहे पण सिनेमात येण्यापूर्वीच त्याची चांगली फॅन फॉलोइंग आहे. अलीकडेच इब्राहिमने दिवाळीनिमित्त इन्स्टाग्रामवर आपले दोन फोटो शेअर केले आहेत. मुली इब्राहिमचा फोटो पाहून त्याच्यावर लट्टू झाल्या आहेत.

ट्रेडिशनल इंडियन ड्रेसमध्ये फोटो शेअर करताना इब्राहिमने लिहिले की, "दिवाळी संपली आहे, आता कॅप्शन नाही मिळत आहे.'' . इब्राहिमच्या फिमेल चाहत्यांना हे फोटो इतके आवडले आहेत की एक चाहतीने त्याला कमेंट्समध्ये लग्नासाठी प्रपोज करत, खूप रोमँटिक ओळी लिहिल्या आहेत.  

सैफ अली खान काही दिवसांपूर्वी एका मुलाखती दरम्यान म्हणाला होता,  त्याची नेहमीच इच्छा होती की त्याचा मुलगा इब्राहिमने बॉलिवूडमध्ये एन्ट्री करावी. त्याची सारा आणि इब्राहिम या दोघांनी अभिनय क्षेत्रात काम करावे ही इच्छा होती. बऱ्याच काळापासून ही चर्चा होती की इब्राहिम लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.आता सैफला वाटते की त्याचा मुलगा आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तयार आहे. आता अभिनय करण्यासाठी फिट आहे. सैफ म्हणाला की, इब्राहिम तयार झाला आहे. माझी इच्छा आहे की माझे सर्व मुले या क्षेत्रात कार्यरत रहावी. ही बेस्ट जागा आहे काम करण्यासाठी.
 

Web Title: Ibrahim ali khan shares diwali pics female fans come with marriage proposals