"ही माझी मुलगीच...", पटौदी कुटुंबात नवीन सदस्याचं आगमन; इब्राहिम अली खानची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 12:58 IST2025-05-13T12:57:51+5:302025-05-13T12:58:35+5:30
इब्राहिम अली खानची पोस्ट चर्चेत

"ही माझी मुलगीच...", पटौदी कुटुंबात नवीन सदस्याचं आगमन; इब्राहिम अली खानची पोस्ट
सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) त्याच्या चार्मिंग लूक्समुळे ओळखला जातो. 'नादानियां' सिनेमातून त्याने यावर्षीच पदार्पण केलं. इब्राहिम त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. कधी पलक तिवारीसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. तर कधी नादानियां सिनेमा फ्लॉप झाल्यामुळे त्याला ट्रोल केलं गेलं. आता इब्राहिमने एक कुत्र्याचं क्युट पिल्लू घरी आणलं आहे. त्याच्यासोबतचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सेटवर असताना एक कुत्र्याचं पिल्लू इब्राहिम अली खानच्या जवळ आलं. तेव्हापासून त्याला त्याचा लळाच लागला. शेवटी तो त्याला घरी घेऊन गेला आणि त्याचं नाव 'बॅम्बी' ठेवलं. त्याने फोटो शेअर करत लिहिले, "एका शूटवेळी मी सेटवर होतो तेव्हा एक छोटा पपी माझ्याजवळ आलं आणि माझ्या मांडीवरच येऊन बसलं. माझ्यासोबत मस्ती करायला लागलं आणि त्याला माझा असा लळा लागला जसा काय आमचं जुनं नातंच आहे. शूट संपलं. ते पिल्ली माझ्या मागे व्हॅनिटीपर्यंतही आलं. केअरटेकर म्हणाला की ती नेहमी असं करत नाही. हे काहीतरी वेगळं आहे. त्या पिल्लानेच मला निवडलं असावं. जसं काय मागच्या जन्मी हे माझं मूलच होतं."
तो पुढे लिहितो,"घरी कुत्र्याला आणायची कायमच आईने बंदी घातली होती. त्यामुळे लहानपणीपासून मी कधीच घरी कुत्रं किंवा त्याच्या पिल्लाला घेऊन गेलो नाही. पण आज पॅकअपनंतर मी जेव्हा या पिल्ला पुन्हा पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यात मला वेगळेच भाव दिसले. तिला घेऊन जाणारा छोटा पिंजरा मला दिसला आणि माझ्या काळजात धस्स झालं. मी शेवटी तिला घरी नेलंच. हा माझा आत्तापर्यंतचा सर्वात हट्टी पण बेस्ट निर्णय होता. तर ही माझी मुलगी आणि पटौदी कुटुंबातली नवी सदस्य बॅम्बी खान."