बॉलिवूडमधलं स्टारकिड कपल! इब्राहिम खानसोबत पार्टीत पोहोचली पलक तिवारी; नेटकरी म्हणाले, 'भाऊ...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 01:42 PM2023-06-22T13:42:10+5:302023-06-22T13:43:55+5:30

स्टारकिड्सचेही अफेअर्स

Ibrahim Ali Khan and Palak Tiwari new couple in town spotted together at a birthday party | बॉलिवूडमधलं स्टारकिड कपल! इब्राहिम खानसोबत पार्टीत पोहोचली पलक तिवारी; नेटकरी म्हणाले, 'भाऊ...'

बॉलिवूडमधलं स्टारकिड कपल! इब्राहिम खानसोबत पार्टीत पोहोचली पलक तिवारी; नेटकरी म्हणाले, 'भाऊ...'

googlenewsNext

बी टाऊनमध्ये सैफ अली खानचा (Saif Ali Khan) मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) आणि श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी (Palak Tiwari) यांच्या अफेअरच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत. इब्राहिम आणि पलक दोघांनाच अनेकदा सोबत पाहिलं गेलं आहे. अनेकदा पलक तिवारी कॅमेऱ्यासमोर चेहरा लपवतानाही दिसली आहे. त्यामुळे आता पुन्हा त्यांना सोबत पाहिलं गेल्याने चर्चेला उधाण आलंय.

सध्या बॉलिवूड कलाकार नाही तर स्टारकिड्सच्या अफेअरचा ट्रेंड सुरु असल्याचं चित्र आहे. शाहरुख खान, काजोल ते श्वेता तिवारी सारख्या अनेक सेलिब्रिटींची मुलं इतर स्टारकिड्सना डेट करत आहेत. त्यांचे एकत्रित पार्टी करतानाचे, एन्जॉय करतानाचे व्हिडिओही व्हायरल होत असतात. नुकतंच इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी करण मेहताच्या बर्थडे पार्टीत सोबतच पोहोचले. त्यांच्या एकत्रित येण्याने पुन्हा चर्चा सुरु झाली. ब्लॅक वनपीसमध्ये पलक तिवारी कमालीची स्टायलिश दिसत होती. तर इब्राहिमनेही ब्लॅक शर्ट आणि ब्लू जीन्स परिधान केले होते. दोघांना बघून बीटाऊनमधलं नवं कपल अशी चर्चा सुरु झाली.

दोघंही एकाच गाडीतून उतरल्याचं स्पष्ट दिसून येतंय. यावर नेटकऱ्यांनीही भन्नाट कमेंट करत त्यांची मजा घेतली आहे. 'काहीही म्हणाला जोडी क्यूट आहे' असं म्हणत चाहत्यांनी पाठिंबा दिलाय. तर काही नेटकरी मात्र भाऊ बहीण दिसतात असं म्हणत त्यांची टर खेचली आहे. दुसरीकडे अनन्या पांडे आणि आर्यन खान, नव्या नवेली नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या अफेअरची सुद्धा सगळीकडे चर्चा आहे. 

इब्राहिम अली खान लवकरच बोमन ईरानीचा मुलगा कोयोज ईरानीच्या 'सरजमीन' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सर्व स्टारकिड्समध्ये सैफचा मुलगा इब्राहिम जास्त स्मार्ट आणि हँडसम असल्याची नेहमीच चर्चा होत असते. तर पलक तिवारीने याचवर्षी सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून पदार्पण केले आहे.

Web Title: Ibrahim Ali Khan and Palak Tiwari new couple in town spotted together at a birthday party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.