आई करिना कपूरच्या कुशीत सुखावला तैमुर; पाहा त्याचा नवाबी अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:35 IST2016-12-21T11:59:20+5:302016-12-21T16:35:37+5:30

बॉलिवूडचं ‘हॉट कपल’ सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांच्या बाळाने काल मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी साडे ...

Iam Kareena Kapoor kushush sukhaola taimur; Look at his newbie! | आई करिना कपूरच्या कुशीत सुखावला तैमुर; पाहा त्याचा नवाबी अंदाज!

आई करिना कपूरच्या कुशीत सुखावला तैमुर; पाहा त्याचा नवाबी अंदाज!

लिवूडचं ‘हॉट कपल’ सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांच्या बाळाने काल मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी साडे सात वाजता जन्म घेतला. बेबोची प्रसूती कधी होते अन् कधी तिच्या बाळाची पहिली झलक पाहायला मिळते, असे ‘बी टाऊन’ सह सर्व चाहत्यांना झाले होते. खरे तर आधी खान कुटुंबियांनी तैमूर अली खानचा फोटो माध्यमांपर्यंत जाऊ नये याची खबरदारी घेतली होती. मात्र, सैफने अचानक तैमूरचा एक क्युट फोटो आऊट केला. या फोटोत चिमुकला तैमूर मॉम करिनाच्या कुशीत छानपैकी पहुडलेला दिसतोय. अगदी नवाबी थाटात मॉमच्या कुशीत तो पहुडलेला आहे. हा फोटो म्हणजे चाहत्यांसाठी निश्चितपणे नव्या वर्षाची ट्रीट आहे. 

तैमूरच्या जन्मानंतर सैफने सोशल मीडियावर चाहते आणि माध्यमांचे आभार मानले. ‘आम्हाला आनंद होतोय की,‘आमच्या पतौडी घराण्याचा वारसदार तैमूर अली खान पतौडी याने २० डिसेंबर २०१६ ला जन्म घेतला. आम्ही माध्यमांचे आभार मानू इच्छितो की, त्यांनी बेबोच्या गरोदरपणातही आम्हाला सहकार्य केले. चाहते आणि हितचिंतक यांच्या शुभेच्छा तर आमच्या सोबत नेहमीच आहेत.  ‘मेरी ख्रिसमस’ आणि ‘हॅप्पी न्यू ईअर’ खऱ्या अर्थाने मी आता म्हणू इच्छितो.  

पतौडी हाऊसमध्ये सध्या अतिशय आनंद, हर्षाेल्हासाचे वातावरण आहे. तसेच कपूर कुटुंबीय देखील त्यांच्यासोबत या आनंदात सहभागी झाले आहेत. लाडका तैमूर आता घरी केव्हा येणार ? याची प्रतीक्षा प्रत्येकजण करतोय. 

                                                                  

Web Title: Iam Kareena Kapoor kushush sukhaola taimur; Look at his newbie!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.