​‘रॉक आॅन २’ची सगळी गाणी मी गाणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 20:19 IST2016-04-14T03:19:39+5:302016-04-13T20:19:39+5:30

‘रॉक आॅन २’ची सगळी गाणी मी गाणार आहे. होय, अभिनेत्री श्रद्धा कपूरने छातीठोकपणे हे सांगितले आहे. ‘आशिकी-२’, ‘हैदर’ आणि ...

I will sing all the songs of Rock and 2! | ​‘रॉक आॅन २’ची सगळी गाणी मी गाणार!

​‘रॉक आॅन २’ची सगळी गाणी मी गाणार!

ॉक आॅन २’ची सगळी गाणी मी गाणार आहे. होय, अभिनेत्री श्रद्धा कपूरने छातीठोकपणे हे सांगितले आहे. ‘आशिकी-२’, ‘हैदर’ आणि ‘एबीसीडी २’मध्ये अभिनयासोबतच आपल्या गायकीचा ‘हुनर’ दाखवणारी श्रद्धा आता ‘रॉक आॅन २’ची सगळी गाणी गाणार आहे. ‘रॉक आॅन २’ हा म्युझिकल ड्रामा आहे. फरहान अख्तर, अर्जून रामपाल, प्राची देसाई व पूरब कोहली यांच्या या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.   टिष्ट्वटरवर आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना एका चाहत्याने ‘रॉक आॅन २’ तू गाणार का? असा प्रश्न श्रद्धाला केला. यावर, होय, मी सर्व गाणी गाणार, असे उत्तर श्रद्धाने दिले. लवकरच श्रद्धा व टायगर श्रॉफचा ‘बागी’ रिलिज होतो आहे. भविष्यात रणवीर सिंह व रणबीर कपूर यांच्यासोबत काम करण्यास श्रद्धा उत्सूक आहे.

Web Title: I will sing all the songs of Rock and 2!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.