​‘सलमान जैसे ‘मंकी’ से मैं नहीं डरूंगी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2016 17:10 IST2016-08-23T11:40:11+5:302016-08-23T17:10:11+5:30

बॉलिवूडमधील कुणीही सलमान खानच्या वाट्याला फारसे जात नाही.‘दबंग’ सलमान अनेक वादात अडकूनही बॉलिवूडमधील लोक त्याच्याविरूद्ध बोलण्याचे टाळतात. ज्यांनी कुणी ...

'I will not be scared' by 'Monkey' like Salman | ​‘सलमान जैसे ‘मंकी’ से मैं नहीं डरूंगी’

​‘सलमान जैसे ‘मंकी’ से मैं नहीं डरूंगी’

लिवूडमधील कुणीही सलमान खानच्या वाट्याला फारसे जात नाही.‘दबंग’ सलमान अनेक वादात अडकूनही बॉलिवूडमधील लोक त्याच्याविरूद्ध बोलण्याचे टाळतात. ज्यांनी कुणी सलमानविरूद्ध पंगा घेतला त्यांना तो भारी पडला. मग तो विवेक ओबेरॉय असो वा गायक अरिजीत सिंह असो. मात्र  कॅप्टन कूल महेन्द्र सिंह धोनी याची हेअर स्टायलिस्ट आणि ‘बिग बॉस6’ची स्पर्धक राहिलेली सपना भवनानी हिने मात्र सलमानविरूद्ध जोरदार मोर्चा उघडला आहे. आज एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सपनाने सलमानविरूद्ध उघड उघड पंगा घेतला.  सपनाने तिच्या पुस्तकात ( memoir) सलमानचा उल्लेख टाळला आहे. याबाबत विचारले असता सपनाने सलमानवर जोरदार हल्ला चढवला. तो माणूस लोकांचा चुकीचा वापर करून घेतो. माझ्या लेखी त्याचे काहीही महत्त्व नाही. विशेषत: माझ्या पुस्तकात. मी सलमानविरोधात बोलते, म्हणून अनेकांनी मला सावध केले. मी याबद्दल अनेक अफवाही ऐकल्या आहेत. सलमानच्या विरोधात बोलशील तर तू ठार मरशील, असे मला सांगण्यात आले. हे माझ्यासाठी धक्कादायक होते. पण मागच्या चार वर्षांत मी सलमानला जराही घाबरलेली नाही. मी एका माकडाला घाबरू इच्छित नाही, असे सपना म्हणाली. सलमानने होस्ट केलेल्या ‘बिग बॉस’मधला अनुभव कसा होता, हे विचारले असता अतिशय खराब असे सपनाने सांगितले. त्या खराब शोमध्ये आमच्याकडे एक उपद्रवी (chauvinistic pig) सारखा होस्ट होता. जो लोकांचा अपमान करायचा. लोक त्याचा शो पाहतात आणि त्यानेच तो होस्ट करावा, यासाठी प्रार्थनाही करतात. कारण त्यांना सलमानच्या अत्यंत सुमार चित्रपटांमध्ये त्यांना भूमिका हवी असते. प्रत्येक चित्रपटात सलमान निव्वळ मर्कटलीला करतो. यापेक्षा त्याच्या चित्रपटांमध्ये काहीही नसते, असेही ती म्हणाली. सपना ‘बिग बॉस6’ची स्पर्धक होती. शोदरम्यानही ती सलमानचा विरोध नोंदवतांना दिसली होती. तिने सलमानला कायम महिलांना मारणारा (serial woman-beater) म्हटले होते. मात्र चॅनलने तिचा हा बाईट्स गाळला होता.

Web Title: 'I will not be scared' by 'Monkey' like Salman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.