/>अ भिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या ध्येयवादी प्रोजेक्ट 'मॅडमजी' साठी एकदिवस निर्माता होणार असल्याचे सांगते. ती म्हणते, एकदिवस येईल की मी 'मॅडमजी' चित्रपटासाठी निर्माता असेन. ती म्हणते,'मॅडमजी' माझ्या हृदयाच्या खुप जवळचा आहे. मी निश्चितच 'मॅडमजी' करणार आहे. पण, सध्या मी करणार नाही. हा चित्रपट मधुर भांडारकर दिग्दर्शित करणार आहेत.' सध्या तिचे बाजीराव मस्तानी तील 'काशीबाई' च्या भूमिकेसाठी खुप कौतुक केले जात आहे. प्रियंकाला बॉलीवूडमध्ये तरी कोणीच स्पर्धा करण्यासारखे वाटत नाही. ती म्हणते,' मला दुसर्यांच्या करिअरमध्ये काहीच इंटरेस्ट नाही. मी माझा माईलस्टोन ठरवून घेत आहे. माझ्यासाठी दिग्दर्शकांनी ज्या चांगल्या भूमिका ठेवल्या त्यासाठी माझ्याकडून धन्यवाद.'

Web Title: I will do 'Madamji' - Priyanka
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.