अॅक्शन सिनेमे बनवण्यासाठी झटत असतो 'वॉर' हे त्याच प्रयत्नांचं प्रतीक : दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 07:07 PM2021-10-02T19:07:05+5:302021-10-02T19:14:43+5:30

दिमाखदार अॅक्शन सिनेमे बनवण्यासाठी आणि गेल्या 5-7 वर्षांपासून, 7 वर्षांपासून, खरंतर बँग बँगपासून मी वॉरसारखे मापदंड ठरू शकणारे अॅक्शन सिनेमे बनवून ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे.’

I Will Always Prefer Directing Action Movies Like War Says Director Siddharth Anand | अॅक्शन सिनेमे बनवण्यासाठी झटत असतो 'वॉर' हे त्याच प्रयत्नांचं प्रतीक : दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद

अॅक्शन सिनेमे बनवण्यासाठी झटत असतो 'वॉर' हे त्याच प्रयत्नांचं प्रतीक : दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद

googlenewsNext

दोन वर्षांपूर्वी वॉर ऑल टाइम ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद भारतातील अॅक्शन- मनोरंजनपटांसाठीचा सर्वात मोठा दिग्दर्शक म्हणून प्रस्थापित झाला. यशराजच्या उत्साहाने सळसळणाऱ्या या नेत्रसुखद सिनेमानं बॉक्स ऑफिस विक्रम, मोठी व्याप्ती, हिट गाणी आणि हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांना एकमेकांविरोधात उभं करत सगळ्याच गोष्टींसह हिंदी सिनेमांच्या इतिहासात नवा मापदंड प्रस्थापित केला. 


 
सिद्धार्थ म्हणाला, ‘हिंदी सिनेमातली अॅक्शन आणि स्टंट्सची पातळी उंचावणे हा वॉर सिनेमाचा हेतू होता. आपले क्षेत्र इतके मोठे आहे आणि आपण वर्षाला कितीतरी सिनेमे बनवतो, पण अॅक्शन सिनेमे फारसे बनवले जात नाही व त्याची या क्षेत्रात पोकळी जाणवते. दिमाखदार अॅक्शन सिनेमे बनवण्यासाठी आणि गेल्या 5-7 वर्षांपासून, 7 वर्षांपासून, खरंतर बँग बँगपासून मी वॉरसारखे मापदंड ठरू शकणारे अॅक्शन सिनेमे बनवून ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘मी विषय आणि कथा निवडतो. मी कथा लिहितो. अॅक्शनचा समावेश असेल अशा कथा मी शोधतो. तेव्हा हो, गेल्या 5-7 वर्षांपासून मी तसा जाणिवपूर्वक प्रयत्न करत आहे आणि ती आता माझी ओळख झाली आहे. माझं संपूर्ण व्यक्तिमत्त्व दमदार अॅक्शन सिनेमे बनवण्यासाठी झटत असतं आणि वॉर हे त्या प्रयत्नांचं प्रतीक आहे. पुढच्या सिनेमातून आणखी मोठा सिनेमा प्रेक्षकांना दाखवण्यासाठी मी अजून जास्त मेहनत करत आहे.’


 
आदित्य चोप्रा आणि त्याला वॉर आतापर्यंत कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावर सादर करायचा होता, तेव्हाच्या आठवणींना सिद्धार्थ आनंदनं उजाळा दिला. हृतिक वि. टायगर ही केवळ पात्र योजनाच नव्हे, तर इतर काही घटकांमुळे वॉर ऑल- टाइम- ब्लॉकबस्टर कसा ठरला हे त्यानं उलगडलं.


  
तो म्हणाला, ‘जबरदस्त कास्टमुळे बॉक्स ऑफिसवर आम्ही दमदार कामगिरी केली असं मला नाही वाटत. वॉर 2019 मध्ये आला आणि त्याआधीच्या 3-4 वर्षांत आपण मोठ्या सुपरस्टारचे बहुचर्चित सिनेमे अपयशी ठरताना पाहिले होते. सगळीकडून त्यांना अपयश मिळत होतं. किंबहुना मध्यम श्रेणीतील कलाकारांचे चांगली संकल्पना असलेले सिनेमे गाजत होते. त्यामुळे मापदंड ठरेल या आशेनं मोठ्या कलाकारांना घेऊन सिनेमा काढणं ही खरंतर तेव्हा जोखीमच होती.’

ते पुढे म्हणाले, ‘अर्थात मोठी स्टार कास्ट असणं जमेची बाजू असते, कारण त्यामुळे तुम्हाला भव्य सिनेमा बनवण्यासाठी आवश्यक बजेट मिळतं, पण म्हणून बॉक्स ऑफिसवर यश मिळतंच असं नाही. तुम्हाला खरंच मेहनत करून प्रेक्षकांना आपलासा वाटेल असा सिनेमा बनवावा लागतो. प्रेक्षकांनी स्टार्ससाठी येणं थांबवलं आहे. ते कथेसाठी आणि सिनेमासाठी येतात. हां. स्टार्सचं असणं हा बोनस असतो व या कल्कारांना ते माहीत आहे. म्हणूनच ते वेळ घेऊन सिनेमांची निवड करतात. कारण त्यांना माहीत असतं, की स्टार्समुळे ओपनिंग मिळतं, पण सिनेमा चालावा लागतो.’

ते पुढे म्हणाले, ‘हृतिक आणि टायगरनं या सिनेमासाठी प्रचंड मेहनत केली. त्यांनी निवांत बसून असा विचार केला नाही, की आम्हाला वायआरएफचं मस्त काम मिळालं आहे, उत्तम बॅनर, चांगला अॅक्शन दिग्दर्शक आहे आणि ‘आम्ही’सुद्धा आहोत, तर सिनेमा यशस्वी होईलच. या उलट त्यांनी प्रचंड मेहनत केली. त्यांनी एक दर्जेदार सिनेमा बनवण्यासाठी दिवसरात्र काम केलंच शिवाय प्रत्येकाला – निर्माता, तंत्रज्ञांपासून प्रत्येकाला प्रोत्साहन देऊन मेहनत केली व वॉरला यश मिळवून दिलं.’ 

आणि जेव्हा लोक कित्येक पिढ्या वॉरकडे वळून पाहातील तेव्हा त्यातून त्यांना काय मिळेल असं सिद्धार्थ आनंद यांना वाटतं? ते म्हणाले, ‘त्यांना माहीत असलेल्या, ते पाहात असलेल्या मोठ्या आंतरराष्ट्रीय सिनेमांतून दिसणारा भव्यपणा त्यांना या ही सिनेमातून मिळेल यावर विश्वास ठेवायला मला आवडेल.’
 
ते पुढे म्हणाले, ‘माझ्या मते, त्यांना कुठेरी अभिमान वाटेल, की आपणही असा सिनेमा आणि तो ही हॉलिवूड सिनेमांच्या बजेटच्या तुलनेत अगदी कमी बजेटमध्ये बनवला होता. तेव्हा हो (माझी इच्छा आहे, की) त्यांनी हा धमाल अॅक्शन सिनेमा म्हणून लक्षात ठेवावा. एक असा सिनेमा जे तो परत पाहू शकतील आणि कदाचित पुढच्या पिढीला दाखवून म्हणून शकतील, की ‘आमच्या काळी असे सिनेमे असायचे.’ हे जरा जास्त होतंय असं मला वाटतंय, पण हो, हा सिनेमा एक मजेदार अॅक्शन सिनेमा म्हणून त्यांनी लक्षात ठेवावा अशी माझी इच्छा आहे.’

Web Title: I Will Always Prefer Directing Action Movies Like War Says Director Siddharth Anand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.