मी वेडा झालो होतो....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 06:55 IST2016-03-15T13:55:53+5:302016-03-15T06:55:53+5:30
होय, मी अक्षरश: वेडा झालो होतो...हे शब्द आहेत...आॅल टाईम फेवरेट रॅपर यो यो हनी सिंह याचे. गत १८ महिन्यांपासून ...

मी वेडा झालो होतो....
ह य, मी अक्षरश: वेडा झालो होतो...हे शब्द आहेत...आॅल टाईम फेवरेट रॅपर यो यो हनी सिंह याचे. गत १८ महिन्यांपासून योयो बॉलिवूडमधून गायब झाला होता. यादरम्यान त्याच्याबद्दल नाही नाही त्या अफवांचे पीक आले होते. १५ मार्च हा हनीचा वाढदिवस. वाढदिवसाच्या दिवशी खुद्द हनी सिंह यानेच या १८ महिन्यांत त्याच्यासोबत काय काय घडले, ते सांगितले आहे. खरे आहे, १८ महिने मी पुरता गायब होतो. बायपोलर डिसआॅर्डरशी माझी झुंज सुरु होती. यादरम्यान मी चार डॉक्टर बदलले. औषधांचा माझ्यावर कुठलाही परिणाम होत नव्हता. मी अक्षरश: वेडा झालो होतो. ते १८ महिने माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण दिवस होते. मी रिहॅब सेंटरमध्ये असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण मी नोएडातील माझ्या घरी होतो, असे हनीने सांगितले. बायपोलर डिआॅर्डरमध्ये रूग्णाचे मूड क्षणाक्षणाला बदलते. कधी पराकोटीचा आनंद तर कधी घोर निराशा, असे त्याचे मूड असते. याच आजारामुळे हनीसिंह मद्याच्या आहारी गेला. इतका की, त्याला हे व्यसन सोडवण्यासाठीही उपचार घ्यावे लागले. पण आता हनी पुन्हा नव्या आत्मविश्वासाने परतला आहे. तेव्हा आॅल दी बेस्ट हनी...!!!