सिनेसृष्टीत मोलाच योगदान असूनही आजपर्यंत एकदाही मिळाला नाही राष्ट्रीय पुरस्कार,व्यक्त केली होती खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 05:54 PM2021-03-22T17:54:29+5:302021-03-22T17:58:00+5:30

Kumar Sanu Opens Up On Not Receiving National Awards Yet: विशेष म्हणजे आतापर्यंत कुमार सानू यांनी 14000 हून अधिक गाणे गायली आहेत. कुमार सानू यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

I Get saddened whenever I hear about National awards due to this reason | सिनेसृष्टीत मोलाच योगदान असूनही आजपर्यंत एकदाही मिळाला नाही राष्ट्रीय पुरस्कार,व्यक्त केली होती खंत

सिनेसृष्टीत मोलाच योगदान असूनही आजपर्यंत एकदाही मिळाला नाही राष्ट्रीय पुरस्कार,व्यक्त केली होती खंत

googlenewsNext

आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात सुपरहिट गाणे देत कुमार सानू यांनी प्रचंड प्रसिद्धी मिळाली. विशेष म्हणजे आतापर्यंत कुमार सानू यांना 14000 हून अधिक गाणी गायली आहेत. गायन क्षेत्रात दिलेल्या अमुल्य कामगीरीबद्दल कुमार सानू यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. मात्र,राष्ट्रीय पुरस्कार काही मिळाला नाही. तब्बल 7 वर्ष राष्ट्रीय पुरस्कारासाठी कुमार सानू यांनी वाट पाहिली मात्र त्यांच्या पदरी नेहमीच निराशाच पडली. 

 

 

नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी राष्ट्रीय पुरस्काराबद्दल त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली होती.  जेव्हा जेव्हा राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा होते, तेव्हा मात्र वाईट वाटते की, नवोदित कलाकारांनाही हा पुरस्कार दिला जातो. नक्कीच यांच्यापेक्षा माझे योगदान या क्षेत्रात जास्त आहे. तरीही याची कधीच दखल घेतली गेली नाही. याचाच अर्थ राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मोठा झोल होत असावा, वेगवेगळ्या प्रकारचे राजकारण तिथेही होतच असणार असेही त्यांनी सांगितले होते.

विशेष म्हणजे 1990 ते 1996 या दरम्यान सलग 7 वर्ष मला राष्ट्रीय पुरस्कार मिळायला पाहिजे होते. कारण याच  वर्षांत माझी सर्व गाणी हिट झाली होती, इतके चांगले काम करुनही माझी या पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली नाही. ज्यावेळी पुरस्कार द्यायचा होता तेव्हा तर दिला नाही ते आता काय माझी दखल घेतील. प्रत्येक वर्षी मी राष्ट्रीय पुरस्कारासाठी वाट बघायचो. एकदाही माझ्या नावाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी घोषणा झाली नाही.आता तर मी या राष्ट्रीय पुरस्कारांची अपेक्षाही सोडली आहे, जेंव्हा भेटायला पाहिजे होते तेव्हा भेटले नाहीत तर आता काय भेटणार आहेत.

''घुँघट के आरसे'' हे गाणे इतके फेमस झाले होते की, आजही या गाण्याची जादू कायम आहे. अलका याग्नीक आणि  कुमार सानू दोघांनी मिळून हे गाणे गायले होते. या गाण्यासाी राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा झाली मात्र पुरस्कार फक्त अलका याग्नीकलाच मिळाला कुमार सानू यांना मिळाला नाही.यावर त्यांनी सांगितले की, पुरस्कार मिळायला हवे असे मला अजिबात वाटत नाही. रसिकांच्या प्रेमापुढे हे पुरस्काराचे काहीच मोल नाही. रसिकांचे प्रेमच माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे .सर्वात महत्वाचे म्हणजे कोणतीही अपेक्षा नसतानाही मला 'पद्मश्री' मिळाला. अजिबात वाटले नव्हते. आयुष्यात कधी पद्मश्री मिळेल याचा विचारही केला नव्हता.

Web Title: I Get saddened whenever I hear about National awards due to this reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.