चित्रपट हिट किंवा फ्लॉप होण्याचा मी विचार करत नाही - अजय देवगण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 12:42 IST2016-10-29T12:34:10+5:302016-10-29T12:42:56+5:30

१९९१ साली  प्रदर्शित झालेल्या फुल और काँटे या चित्रपटातून २५ वर्षांपूर्वी अजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे कौतुक ...

I do not think the movie will be hit or flop - Ajay Devgan | चित्रपट हिट किंवा फ्लॉप होण्याचा मी विचार करत नाही - अजय देवगण

चित्रपट हिट किंवा फ्लॉप होण्याचा मी विचार करत नाही - अजय देवगण

९१ साली  प्रदर्शित झालेल्या फुल और काँटे या चित्रपटातून २५ वर्षांपूर्वी अजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे कौतुक झाले.  स्टंट डायरेक्टरच्या या मुलाने अनेक बंधने तोडून शक्य असेल तितक्या ऊर्जेचा वापर केला, हे खूप थोड्या जणांना माहिती होते.  इश्कमधील त्याचा रोमान्स, गोलमालमधील कॉमेडी सर्वांनाच माहिती आहेत. गेल्या दोन दशकातील त्याच्या यादीत अनेक हिट्सचा समावेश आहे. पद्मश्री आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता अजय हा लोकप्रिय अभिनेत्यासोबत यशस्वी चित्रपट निर्माता आहे. त्याच्या दिग्दर्शनात ‘शिवाय’ हा चित्रपट येतो आहे. त्याच्या एकूणच प्रवासाविषयी व्यक्त केलेले हे मत...

तू पदार्पण केलेल्या फुल और काँटे या चित्रपटाला या नोव्हेंबरमध्ये २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या २५ वर्षांच्या प्रवासाविषयी तू काय सांगशील?
-२५ वर्षे अगदी सहज निघून गेली. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर कठोर परिश्रमासोबतच माझ्या करिअरबाबत मी खूपच लकी आहे. या प्रवासात अनेक हिट आणि फ्लॉपचा समावेश आहे. फ्लॉप झालेल्या चित्रपटांमुळे माझ्यावर फारसा परिणाम झाला नाही, याबाबतीत मी स्वत:ला खूपच भाग्यवान समजतो.


तू अशावेळी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, ज्यावेळी आघाडीचे कलाकार हे स्टार किड्स होते आणि लव्ह स्टोरीज बॉक्स ऑफिसवर चालायच्या. तू आणि काही कालावधीनंतर अक्षय कुमार यांनी, अ‍ॅक्शन चित्रपटांना नाव मिळवून दिले. तुझ्या या अनुभवाविषयी काही सांगशील?
-मला इतर अभिनेत्यांविषयी आणि त्यांच्या कारणांविषयी काही बोलायचे नाही, परंतु माझ्या मते तो एक पर्याय होता. माझ्या वडिलांच्या मित्राने मला संधी दिली. माझे वडील लोकप्रिय स्टंट डायरेक्टर होते. त्यामुळे मला अ‍ॅक्शन पठडीचे चित्रपट मिळाले. मी अ‍ॅक्शन डायरेक्टरचा मुलगा असल्याने लोक माझ्याकडून अ‍ॅक्शनची अपेक्षा करीत असावेत. मी काहीही निवडले नव्हते, किंबहुना मलाच निवडले गेले.


चित्रपट व्यवसाय हा करिअर म्हणून निवडण्यामागे नेमके कोणते कारण होते? तुला चित्रपट कधीपासून आवडू लागले?

-चित्रपट माझ्या रक्तात आहे आणि मला कथा सांगायला आवडतात. शूटिंगदरम्यान मी वडिलांसोबत जायचो, अधूनमधून त्यांना मदतही करायचो. मी चित्रपटात नसतो तर काय झालो असतो हे माहिती नाही. मला चित्रपटांचे आकर्षण होते. चित्रपटात मला जे काही शक्य होते, ते मी सर्व केले आहे.


तुझ्या ‘शिवाय’ या येणाऱ्या चित्रपटाविषयी बरेच काही बोलले जाते. फर्स्ट लूक आणि टीजरला चांगला प्रतिसाद मिळालाय. तू याकडे कसे पाहतो?
- एका वर्तमानपत्राच्या लेखाने याची सुरुवात झाली. संदीप श्रीवास्तव यांने ही स्क्रीप्ट लिहिली आणि तो माझ्याकडे आला. मला ही कथा आवडली आणि आम्ही यावर नंतर काम केले. नायकाच्या भावना मला खूप आवडल्या. मी कथेकडे आकर्षिलो गेलो. त्या पात्रामध्ये प्रामाणिकपणा, सत्यता आहे. आम्ही त्याला साधारण भारतीय मनुष्याप्रमाणे ‘शिवाय’ हे नाव दिले. भगवान शंकराप्रमाणे भोळा आणि कठोर असे हे व्यक्तिमत्त्व आहे.


या चित्रपटाचे बरेचसे शूटिंग बल्गेरियामध्ये झाले आहे. यादरम्यान घडलेला एखादा किस्सा तू सांगशील?
-खूप काही आहेत. त्या ठिकाणचे हवामान आणि खराब स्थितीत शूटिंग कसे केले असेल, याविषयी मी आश्चर्यचकीत झालोय. मला वाटते मी भाग्यवान आहे आणि मला मिळालेल्या शक्तीबद्दल आभार मानतो. माझ्या ताकदीविषयी माझ्या स्वत:चा काही विश्वास आहे. सर्व शक्यताना दूर सारत आम्ही काम केले आहे. याचे सर्व श्रेय माझ्या टीमला जाते. त्यांनी सर्व कठीण परिस्थितींशी तोंड देत हे यशस्वी केले. 

शिवायची निर्मिती करताना काय अडचणी आल्या? हा चित्रपट ब्लॉकबस्टरपेक्षा कमी नाही असे वाटते.
-तुम्ही ब्लॉकबस्टर होईल म्हणून सुरूवात करु शकत नाही. तुम्ही फक्त चित्रपट निर्माण करता. चित्रपट ब्लॉकबस्टर होतात. ‘शिवाय’ च्या निर्मितीत अनेक आव्हाने उभी राहिली. कास्टिंगपासून शूटिंग दरम्यान झालेल्या बर्फवृष्टीपर्यंत, कोठून सुरुवात करावी हे कळत नाही. निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय यांच्यात संतुलन ठेवणे महत्त्वाचे आहे. कॅनडा, पोलंड आणि शेवटी बल्गेरियामध्ये आम्ही शूटिंग केले. विविध देशांतील नागरिकांसोबत काम केले आणि आमच्या लक्षात आले की योग्य ठिकाणी काम करीत आहोत. आमच्या टीममधील प्रत्येक सदस्याने स्वत:चा चित्रपट म्हणून काम केले आहे. प्रदर्शनापूर्वी शिवाय ब्लॉकबस्टर झालाय याबद्दल आभार.

बॉलिवूडमध्ये खूपच रिस्क आहे. निर्माते हे नेहमीचीच पायवाट धरतात. तू अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या व्यवसायात हे सोपे आहे?
-मी खूपच लकी आहे. हे खूप अवघड आहे. प्रत्येक चित्रपटात रिस्क आहे. हा व्यवसायाचा स्थायीभाव आहे. मी अनेक नॉर्म्स मोडलेले आहेत. एकसारख्या गोष्टी वारंवार करणे म्हणजे मला कंटाळवाणे वाटते. मला स्वत:ला परिवर्तन आवडते. मी नेहमीच चॅलेंज स्वीकारतो. हाच एकमेव उपाय असल्याचे समजतो. हळूहळू वाढ ही महत्त्वाची आहे, त्यामुळे तुम्हाला गमावण्यासारखे काही नसते.

Web Title: I do not think the movie will be hit or flop - Ajay Devgan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.