थँक्सलेस जॉब मला पसंत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:53 IST2016-01-16T01:08:55+5:302016-02-04T11:53:36+5:30
ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांना केंद्रीय फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाची संधी मिळणार होती. स्वत: ऋषी कपूरनेच याचा गौप्यस्फोट केला ...

थँक्सलेस जॉब मला पसंत नाही
ज येष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांना केंद्रीय फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाची संधी मिळणार होती. स्वत: ऋषी कपूरनेच याचा गौप्यस्फोट केला आहे. हो, मला अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत विचारणा करण्यात आली होती; मात्र हा थँक्सलेस जॉब मला पसंत नाही. तासन्तास चित्रपट पाहण्याचा संयम माझ्याजवळ नाही. त्यामुळे मी ही ऑफर नाकारली, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या सेन्सॉर बोर्डाच्या धोरणाबाबत विचारले असता, त्यांनी गप्प बसने पसंत केले. सध्याचे अध्यक्ष पहलाज निहलानी त्यांच्या कार्यपद्धतीमुळे वादात अडकले आहेत. ऋषी कपूर यांचा 'ऑल इज वेल' हा सिनेमा मध्यंतरी आला होता. त्यात सुप्रिया पाठक, अभिषेक बच्चन व असिन ही अभिनेत्री होती. त्यानंतर त्यांचा कोणताही चित्रपट आलेला नाही. लवकर त्यांचा 'कपूर अँड सन्स' हा करण जोहरचा चित्रपट प्रदर्शित होत आहे.