​‘ मी व हृतिक पुन्हा एकत्र येणे शक्य नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2016 21:03 IST2016-05-02T15:33:14+5:302016-05-02T21:03:14+5:30

कंगनासोबतच्या वादानंतर हृतिक रोशन आणि त्याची एक्स वाईफ सुजैन खान पुन्हा एकत्र येत असल्याच्या वार्ता सध्या कानी पडताहेत. आधी ...

'I and Hrithik can not be reconnected' | ​‘ मी व हृतिक पुन्हा एकत्र येणे शक्य नाही’

​‘ मी व हृतिक पुन्हा एकत्र येणे शक्य नाही’

गनासोबतच्या वादानंतर हृतिक रोशन आणि त्याची एक्स वाईफ सुजैन खान पुन्हा एकत्र येत असल्याच्या वार्ता सध्या कानी पडताहेत. आधी सुजैनने  कंगनाच्या वादात हृतिकची बाजू घेतली आणि काल मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हृतिक  व सुजैन एकत्र दिसले. त्यामुळे हृतिक-सुजैन पुन्हा एकत्र येणार, या बातमीने जोर धरला. पण ही बातमी निव्वळ मीडियाचे तर्क असल्याचे सुजैनने स्पष्ट केले आहे. मी व हृतिक आता कधीही एकत्र येऊ शकत नाही. मात्र आम्ही दोघेही अखेरपर्यंत चांगल्या पालकांचे कर्तव्य पार पाडू. यालाच आमचे प्राधान्य असेल, असे टिष्ट्वट सुजैनने केले आहे. केवळ एवढेच नाही तर आमच्याबद्दल तर्कवितर्क लढवणे थांबवा, अशी विनंतीही तिने केली आहे. हृतिक व सुजैन यांनी २०१४ मध्ये घटस्फोट घेतला होता. मात्र मुलांचे संगोपन ते दोघेही एकत्र मिळून करताहेत.

Web Title: 'I and Hrithik can not be reconnected'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.